dr Bharti Pawar
dr Bharti Pawar esakal
नाशिक

Red Onion Purchase | नाफेडमार्फत जिल्ह्यात लाल कांदा खरेदी सुरू : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळल्याने विविध ठिकाणी सोमवारी (ता. २७) कांदाउत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलने सुरू असतानाच, लाल कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नाशिक पट्ट्यातील कांद्याच्या घसरलेल्या किमतीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खरीप कांदा खरेदी सुरू केली आहे. (Dr Bharti Pawar statement Purchase of red onion in district through NAFED Union Commerce Minister Piyush Goyal gave approval nashik news)

नाफेडने जिल्ह्यात मर्यादित केंद्रे सुरू केली असून, ती वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या हालचालींमुळे कांदा बाजाराला स्थिरता मिळणार आहे. नाफेडमार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी, याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागणी केली होती.

याची तत्काळ दखल घेत लाल कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू झाल्याची माहिती मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ. भारती पवार यांना दिली आहे. सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीप्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, यासाठी डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले होते.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ नाफेडमार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी, अशा आशयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते.

महाराष्ट्रात यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आल्याने याचा परिणाम भावावर झाल्याने कांद्याचे दर घसरले होते. परिणामी, शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना त्रास सहन करावा लागत होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, कांदा पीक कमी किमतीत विक्री करावे लागत असल्याने, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॉ. पवार यांची भेट घेऊन नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी करण्याबाबत मागणी केली होती.

याची दखल घेत डॉ. पवार यांनी सदरची बाब केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर सोमवारी (ता. २७) लाल कांदा खरेदीला परवानगी मिळाली असल्याची माहिती डॅा. भारती पवार यांनी दिली.

नाफेडने एप्रिल २०२३ पासून बफर स्टॉकिंगसाठी रब्बी कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. सर्वांत मोठी खरेदी नाशिक जिल्ह्यात होते. या केंद्रांवर चांगला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार आणि सुका साठा खरेदी केंद्रांवर आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट केले जाईल.

लाल कांदा खरेदीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याने डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानलेत.

"कांदा निर्यात बंद असल्याबाबत विरोधकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. कांदा निर्यात ही खुली आहे. काही देशांकडे पत नसल्याने, त्यांच्याकडून कांदा खरेदी केली जात नाही. परंतु, भारताकडून अशी कोणतीही निर्यात बंदी नाही."

-डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, भारत सरकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT