Shyaamchi Aai Book esakal
नाशिक

Nashik News : श्‍यामची आई कादंबरी नव्हे, एक संस्कारग्रंथ : डॉ. बोकील-कुलकर्णी

अफाट वाचन असलेल्या साने गुरुजींचे हे पुस्तक एक संस्कारग्रंथ असल्याचे प्रतिपादन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता. २५) केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साहित्याच्या दृष्टीने ‘श्‍यामची आई’ कलाकृतीच नाही, असा आक्षेप तत्कालीन समीक्षकांनी घेतला. तरीही त्यातील प्रसंग, बारकावे व भाषा यामुळे हे संवादी साहित्य सर्वसामान्यांच्या मनाला भिडल्याने या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या.

अफाट वाचन असलेल्या साने गुरुजींचे हे पुस्तक एक संस्कारग्रंथ असल्याचे प्रतिपादन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता. २५) केले. (Dr Bokil Kulkarni statement at Concludes sarvajanik vachnalay nashik Library Week Nashik News)

शुक्रवार (ता. १९)पासून सार्वजनिक वाचनालयाच्या (कै.) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

कवी अभिनेते किशोर कदम, डॉ. अतुल पाटील, डॉ. गिरीश जाखोटिया, अशोक समेळ, संदेश भंडारे, विश्‍वास पाटील यांच्या व्याख्यानानंतर गुरुवारी डॉ. बोकील-कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने सप्ताहाचा समारोप झाला.

व्याख्यानापूर्वी बी.ए. मराठीत प्रथम आलेल्या अनुराधा पवार व एम.ए. मराठीत प्रथम आलेल्या शोभा पगारे यांचा डॉ. बोकील-कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर ‘सावाना’चे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, धर्माजी बोडके, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, गणेश बर्वे, प्रेरणा बेळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुनील कुटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

श्री. बोडके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ग्रंथ सचिव जोशी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. वैद्य जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतातून वाचक चळवळ अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी ग्रंथालय सप्ताहासारखे उपक्रम आवश्‍यक असल्याचे सांगितले. मंगेश मालपाठक यांनी सूत्रसंचालन केले.

अफाट वाचन असलेल्या साने गुरुजींचे साहित्य रडके असल्याचा आक्षेप तत्कालीन अनेक समीक्षकांनी घेतला.

एवढेच नव्हे, तर पहिला सुवर्णपदक चित्रपटाचा मान मिळविलेल्या ‘श्‍यामची आई’ ही कलाकृतीच नव्हे, असाही आक्षेप घेण्यात आला; परंतु पुढे प्रकाशित झालेल्या अनेक आवृत्त्यांनीच या कादंबरीचे श्रेष्ठत्व सिद्ध केल्याचे डॉ. बोकील-कुलकर्णी यांनी सांगितले.

तुरुंगातील आपल्या वास्तव्यात सहकाऱ्यांना आपल्या आईची आठवण सांगणारे सहज सोप्या भाषेतील हे संवादी साहित्य वाचकांच्या मनाला भिडल्यानेच त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्याचे डॉ. बोकील-कुलकर्णी यांनी शेवटी सांगितले. प्रेरणा बेळे यांनी आभार मानले.

प्रेक्षकांची पाठ

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात कवी सौमित्र (किशोर कदम), विश्‍वास पाटील यांच्यासारख्या वक्त्यांनी हजेरी लावूनही नाशिककरांनी या सप्ताहाकडे पाठ फिरविली.

त्यामुळे बुधवार (ता. २४)चा अपवाद वगळता सप्ताहाला हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच वाचक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT