Municipal Commissioner Dr. Honorable while felicitating Chandrakant Pulkundwar. esakal
नाशिक

पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मेरी, औद्योगिक संस्था आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेबरोबर हातात हात घालून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

आयमा, मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने के. आर. बूब सभागृहात उद्योगांसाठी ‘स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय’ विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. (Dr Chandrakant Pulkundwar statement on environment conservation Nashik Latest Marathi News)

व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, नवी दिल्ली येथील विकास व सहकार्याबाबतच्या स्विस एजन्सीचे प्रमुख डॉ. जोनाथन डेमंग, कार्यक्रम अधिकारी आंद्रे मुलर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, टेरीचे पर्यावरण केंद्राचे अधिकारी डॉ. अरिंदम दत्ता, महिंद्रा ॲन्ड महिंद्राचे उपमहाव्यवस्थापक धनंजय जोशी, ब्रेम्बो ब्रेक इंडियाचे राकेश मुसळे आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे पर्यावरण अधिकारी चेतनकुमार सांगोळे, आयमाचे सरचिटणीस ललित बूब आदी होते.

ग्लोबल वार्मिंगला सामोरे जाण्यास नाशिक महापालिका सज्ज आहे. नाशिककरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यास मास्टर प्लॅन तयार असून, ११ शुद्धीकरण केंद्र कार्यरत आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचा विस्तारही करण्यात येत आहे. वायुप्रदूषण रोखण्यास महापालिकेने चांगल्या प्रतीच्या २५० बस खरेदी केल्या असून, पैकी २०० सीएनजीवर आधारित आहेत.

१०६ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यास निधी उपलब्ध करून देणार.गोदेचे प्रदूषण रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी नमूद केले. ग्लोबल वार्मिंगचा धोका वेळीच ओळखून त्याला सर्व जण सामोरे जात आहेत आणि उद्योजकही त्यावर उपाय शोधत आहेत ही बाब निश्चितच स्तुत्य आहे, असे स्विस एजन्सीचे प्रमुख जोनाथन डेमंग आणि कार्यक्रम अधिकारी आंद्रे मुलर यांनी भाषणात सांगितले.

उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनीही प्रदूषण रोखण्यास त्यांच्या खात्यातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. पर्यावरण विषयक अधिकारी राकेश मुसळे आणि टेरी (नवी दिल्ली) चे अधिकारी डॉ. अरिंदम दत्ता यांनी सुयोग्य कामकाज परिस्थिती, पोषक वातावरण आणि पर्यावरणपूरक उत्पादकता याबाबत चित्रफितीद्वारे उपस्थित उद्योजकांना माहिती दिली.

धनंजय जोशी यांनी नाशिक येथील महिंद्राच्या प्रकल्पात राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक बाबींची माहिती विशद केली. प्रारंभी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. चेंबर ऑफ कॉमर्सचे चेतनकुमार सांगोळे यांनी सूत्रसंचालन केले. आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले. चर्चासत्रास अशोक ब्राह्मणकर, राधाकृष्ण नाईकवाडे यांच्यासह शंभराहून अधिक उद्योजक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT