While handing over the LED Smart TV to the school teachers, Dr. Narayan Sonawane. esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा परिषद शाळेस आईच्या स्मरणार्थ स्मार्ट टीव्ही भेट; डॉ. नारायण सोनवणे यांचे सामाजिक कार्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुसंस्कराचं शिक्षण देणारी आई जग सोडून गेली. तिची आठवण कायम स्मरणात राहावी, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना जपत डॉ. नारायण सोनवणे यांनी खडकतळे (ता. देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातुन एल.ई. डी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला.

नाशिक येथील डॉ. नारायण सोनवणे हे सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आईच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी या उद्देशाने कार्य करीत असतात. (dr Gift of Smart TV to zp School in memory of mother nashik news)

खडकतळे गावातील रहिवासी तसेच निफाड तालुक्यात नोकरीच्या निमित्ताने स्थिरावलेले प्राथमिक शिक्षक बाळासाहेब पगार यांना डॉ. सोनवणे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली त्यांनी डॉ. सोनवणे यांची भेट घेत खडकतळे येथील शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.

गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एल. ई. डी. स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देणेसाठी डॉ. सोनवणे यांना विनंती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. पगार यांच्या शब्दाला जागत डॉ. सोनवणे यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ खडकतळे येथील बाळासाहेब पगार, सामाजिक कार्यकर्ते बंटी पवार, मुख्याध्यापिका सुनिता भामरे, अभिमन्यु थोरात, माणिक आहेर, बाळासाहेब लांडगे यांच्या उपस्थितीत शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सरपंच, उपसरपंच राजश्री पवार, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी डॉ. सोनवणे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT