While giving information about the record robotic surgeries done at HCG Humanity Cancer Center, Dr. Raj Nagarkar.  esakal
नाशिक

Nashik News : 50 महिन्‍यात एक हजार रोबोटिक शस्‍त्रक्रिया : डॉ. राज नगरकर

नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये ५० महिन्‍यांच्‍या कालावधीत एक हजार रोबोटिक शस्‍त्रक्रियांचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये ५० महिन्‍यांच्‍या कालावधीत एक हजार रोबोटिक शस्‍त्रक्रियांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. रोबोटिक असिस्‍टेड सर्जरीच्‍या माध्यमातून रुग्‍णालयांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडले आहेत.

शस्‍त्रक्रियेतील वेदना कमी होणे, जलद गतीने रिकव्‍हरीसह इतर विविध फायदे होत असल्‍याने रुग्‍णांचा रोबोटिक शस्‍त्रक्रियेकडे कल वाढतो आहे, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे एमडी व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲन्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Dr Raj Nagarkar statement One thousand robotic surgeries in 50 months Nashik News)

याप्रसंगी डॉ. सरशेंदू रॉय, डॉ. विकास जैन, डॉ. आदित्य आढाव, डॉ. मोहसिना हुसेन, कीर्तिकुमार आव्हाड आदी उपस्‍थित होते.

डॉ. नगरकर म्‍हणाले, सेंटरमध्ये १ हजार रोबोटिक असिस्‍टेड शस्‍त्रक्रियांची ऐतिहासिक कामगिरी सीएमआर सर्जिकलच्‍या व्‍हर्सिअस रोबोटिक सिस्‍टीम प्रणालीच्‍या माध्यमातून झाली आहे.

गुंतागुंतीच्‍या शस्‍त्रक्रिया सुलभरीत्या पार पाडल्‍या. व्‍हर्सिअस रोबोटिक सिस्‍टम प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली. सेंटरमध्ये रोबोटिक शस्‍त्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोलंड येथून चौदा, तसेच इजिप्त, पाकिस्‍तान, ऑस्‍ट्रेलिया, न्यूझीलंड, तुर्की, बांगलादेश आदी देशांतून सुमारे पन्नास शल्‍यचिकित्‍सक दाखल झाले आहेत.

त्‍यामुळे रोबोटिक शस्‍त्रक्रिया प्रशिक्षण देणारे जागतिक स्‍तरावरील आघाडीचे केंद्र म्‍हणून रुग्‍णालय नावारूपाला आले आहे, असे डॉ. राज नगरकर म्‍हणाले.

पंधरा दिवसांत कार्यालयात जाऊ लागलो

रोबोटिक शस्‍त्रक्रिया झालेल्‍या कीर्तिकुमार आव्‍हाड यांनी अनुभव सांगितला. ते म्‍हणाले, की अन्ननलिकेचा कर्करोगाचे निदान झाल्‍यानंतर डॉ. नगरकर यांनी रोबोटिक शस्‍त्रक्रियेचा पर्याय दिला. एरवी पंधरा दिवस रुग्‍णालयात दाखल व्‍हावे लागले असते.

मात्र रोबोटिक शस्‍त्रक्रियेमुळे वेदना कमी इतरही त्रास कमी झाला. रुग्‍णालयातील मुक्‍काम घटला व जलदगतीने बरा झाल्‍याने पंधरा दिवसांत कार्यालयात जाण्यासाठी सज्‍ज झालो होतो. या शस्‍त्रक्रियेमुळे जीवनाचा स्‍तर सुधारल्याचा अनुभव त्‍यांनी सांगितला.

विक्रमी रोबोटिक शस्‍त्रक्रियेच्‍या नोंदी-

- सीएमआर प्रणालीवर सर्वाधिक शस्त्रक्रियेचा विक्रम

- स्‍तनांच्‍या कर्करोगावर रोबोटिक सर्जरी करणारे जगातील पहिले रुग्‍णालय

- थायरॉईड ग्रंथीच्‍या बारा शस्‍त्रक्रिया, उत्तर महाराष्ट्रात विक्रम

- बारा परदेशी रुग्‍णांवर केली रोबोटिक शस्‍त्रक्रिया

- बायपास झालेल्‍या ७९ वर्षीय रुग्‍णावर नुकतीच यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT