Nashik Smart City  esakal
नाशिक

नाशिक : रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच पाण्याचा निचरा

विक्रांत मते

नाशिक : प्रत्येक पावसामध्ये सराफ बाजार व दहिपूल भागात पाणी साचत असल्याचे तक्रारी होत असल्या तरी प्रत्यक्षात स्मार्टसिटीच्या (Smart city) गावठाण विकास योजनेअंतर्गत (Gaothan Vikas Yojana) अद्यापही १३१ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. जोपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत सराफ बाजारात पाणी तुंबणे बंद होणार नाही. असे स्पष्टीकरण स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिले. (Drainage of water only after completion of road works Smart City Work Nashik News)

स्मार्टसिटी मिशन अंतर्गत सिटी लेवल ॲडव्हायसरी फोरम नियुक्त करण्यात आलेला आहे. या फोरमची सहावी बैठक ऑनलाइन झाली. या वेळी फोरममध्ये सराफ बाजारातील पाणी तुंबण्याच्या प्रकारावर विचारणा करण्यात आली. या वेळी स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्मार्टसिटीअंतर्गत गावठाण विकास योजना राबविली जात आहे. गावठाण विकास योजनेअंतर्गत १७१ रस्ते तयार केले जाणार आहेत. एकूण रस्त्यांपैकी आतापर्यंत ४० रस्त्यांची कामे सुरू आहे. रस्ते तयार करताना केबल डकट, ड्रेनेज पाइपलाइन आदींची सुविधा पुरविली जात आहे. गावठाणातील रस्ते छोटे असल्याने कामे करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात विलंबदेखील होत आहे. धुमाळ पॉइंट ते दहिपूल या एकमेव रस्त्याचे काम झाले आहे. अद्यापही १३१ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यानंतर ही कामे सुरू होतील. गावठाणातील संपूर्ण १७१ रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत गावठाणातील संपूर्ण पाण्याचा निचरा होणार नाही.

शहरात पर्यावरण सेंसर

शहरात २६ पर्यावरण सेन्सर पोचविण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता, परंतु केंद्र सरकारने पर्यावरण सेन्सर बसवून याला स्थगिती दिली होती. मात्र, स्मार्टसिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी स्थगिती उठवली आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत २६ ठिकाणी सेंसर बसविले जाणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसण्याचे काम सुरू आहे. गेटचे सुट्टे भाग अमेरिकेतून मागविले जात आहे. भूमिगत करण्याच्या कामाला मान्यता मिळाली असून, ते काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

नवीन ४७ सिग्नल

शहरातील वाढत्या वाढत्या वाहतुकीला वळण लावण्यासाठी नव्याने ४७ सिग्नल बसविले जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत प्रारंभी ४० सिग्नल बसविले जाणार होते. आता त्यात नव्याने सात सिग्नलची भर घालण्यात आली असून, एकूण ४७ सिग्नल बसविले जाणार आहे. बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सेक्रेटरी विनी दत्ता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट चेअरमन रसिक बोथरा, नाशिक युवा फाउंडेशनचे स्वप्नील येवले, नाशिक युथ क्लबचे रविराज लभडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Data Leak: आॅनलाइन सुरक्षा धोक्यात! ‘एसबीआय’चा डेटा लीक झाल्याचा संशय; डार्क वेबवरील ग्राहकांच्या माहितीने खळबळ

Gokul Chairman Election : दारात मांडव, पंगत बसणार, गुलालाची उधळण; गोकुळ संस्थांपकांचा चिरंजीव शशिकांत पाटील होणार 'या' तारखेला अध्यक्ष, सतेज पाटलांचा शब्द

Jio Platforms IPO: ‘जिओ’च्या आयपीओचा नवा विक्रम; पहिल्याच दिवशी शंभर मिनिटांत शंभर टक्के बोली, संस्थात्मक गुंतवणूकदारांची ९ पट बोली

Maharashtra Weather Forecast : राज्यात उकाडा वाढणार, मात्र या भागांत पावसाची शक्यता; जाणून घ्या पुढील ३ दिवस कसे असेल हवामान?

Pune Airport Project: पुरंदर विमानतळासाठी सक्तीने भूसंपादन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, विकसित भूखंडाची सवलतही नाही

SCROLL FOR NEXT