Housewives buying kharik, coconuts here
Housewives buying kharik, coconuts here esakal
नाशिक

Nashik News : माळमाथ्यावर गावोगावी मिळतोय सुकामेवा; जळगावकडील विक्रेत्यांची भटकंती

दीपक देशमुख

Nashik News : आरोग्यदायी हिवाळ्यात शरीर संवर्धनासाठी ग्रामीण भागात विविध प्रकारचे पौष्टिक लाडू बनवण्याची ग्रामीण भागात लगबग सुरू आहे.

वर्षभर श्रमाचे काम करणारे शेतकरी, शेतमजूर आदींसह लहानथोरांची शरीर संवर्धनासाठी विविध प्रकारच्या पौष्टिक लाडूंना पसंती दिसून येते.(Dried fruits are available from village to village on Malmatha due to winter nashik news)

लाडू तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू पदार्थांना मोठी मागणी असते. अशा वेळी परराज्यातील सुकामेवा विक्रेते विविध वाहनांवर खारीक, खोबरे, डिंक, सुकामेवा थेट घरापर्यंत विक्रीसाठी येत असल्याने महिला या वस्तू खरेदीला पसंती देतात. चोखंदळपणे होलसेलच्या भावात सुकामेवा घरपोच मिळत असल्याने येथील गल्ली, नववसाहतींमधील महिला निवडून साहित्य खरेदी करून लाडूसह वर्षभर वापरासाठी खोबरे खरेदी करतात.

माळमाथ्यासह ग्रामीण भागात विविध भागात जळगावकडील तसेच परराज्यातील विक्रेते फेरी करून सुकामेवा, डिंक, खारीक, खोबरे विक्री करीत आहेत. शहरी भागातील महिला सुपर मार्केटमध्ये जाणून सुकामेवा खरेदी करताना दिसतात.

मात्र ग्रामीण भागात गल्लोगल्ली फिरून सुकामेवा विक्रेते होलसेल दरात वस्तू उपलब्ध करून देत असल्याने ‌वेळ व पैसा दोन्हींची बचत होत असल्याने खरेदीला पसंती दिसून येते. थेट दारावर विक्रेते येत असल्याने या आरोग्यदायी ऋतूत खरेदीचा मोह महिलांना आवरणे मुश्‍कील होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सुकामेव्याच्या दरात ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे डिंक-मेथीचे लाडूही खर्चिक झाले आहेत. ग्रामीण भागात मोजक्या पाच- सहा वस्तू वापरून मेथीचे लाडू तयार केले जातात. शहरी व नोकरदार वर्ग मात्र खारीक, डिंक, खोबरे, काजू, बदाम या बरोबरच पौष्टिक असलेल्या लाडूमध्ये पिस्ता, अंजीर, गोडंबी, मगज आदींचा वापर करतात.

वस्तूचे प्रतिकिलोचे दर...

खोबरे ------१५०

खारीक -----२५०

डिंक -------८००

मेथी -------१००

बदाम ------७००

काजू -------८००

''वर्षभर विविध गावांमध्ये जाऊन हंगामातील गरज ओळखून वस्तू विकून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करतो. मध्यप्रदेश मधील मंदसोर जिल्ह्यातून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील गावांत घरोघरी जाऊन सुकामेवासह विविध वस्तू विक्री करतो.''- सुनील नाथ व दिनेश नाथ, सुकामेवा विक्रेते, मंदसोर, मध्यप्रदेश.

''हिवाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त लाडू बनविण्यासाठी सुकामेवासह विविध वस्तू खरेदी कराव्या लागतात. साहित्य खरेदीसाठी बाजारात न जाता घरासमोर वस्तू होलसेल दरात मिळत असल्याने वेळ व पैसा दोन्हींची बचत होते. वस्तू निवडीने गुणवत्ता पूर्ण खरेदी करता येतात.''- सुनीता भामरे, गृहिणी, झोडगे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT