A channel through a sewer. esakal
नाशिक

Nashik News : थेट गटारीतून पिण्याचे पाणी; इगतपुरीकरांच्या जीवाशी खेळ

शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ नवीन वर्षाच्या सुरवातीलाच होत असून, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ नवीन वर्षाच्या सुरवातीलाच होत असून, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अनेक ठिकाणी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या दोन दिवसांपासून फुटली असून, त्यांना वेल्डिंग मारून दुरुस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Drinking water directly from sewer in igatpuri nashik news)

अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनी नालीत आहे. त्यामुळे नालीतील पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. गाळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची नामुष्की इगतपुरी शहरातील नागरिकांवर ओढवली आहे.

जागोजागी नळाच्या पाईप लाईन सुद्धा फुटल्या असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.मात्र पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नवीन कनेक्शन जोडण्यात मग्न आहेत. वारंवार सांगूनही जलवाहिनीचे काम होत नसल्याने पाणी वाया जात आहे.

गटारातील व नाल्यातील पाणी जलवाहिनीद्वारे जात असल्याने नागरिकांना पोटांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असून, नवीन कामात पैसे भेटत असल्याने जुन्या कामांकडे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी हेतूपुरस्कर डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT