police action against non helmet users in nashik esakal
नाशिक

हेल्मेट नसेल तर वाहन जप्त; चालकांचे सक्तीने होणार समुपदेशन

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात दुचाकी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण हेल्मेट वापरत नसल्याचे पुढे आले आहे. त्यातूनच मागील एकट्या ऑगस्ट महिण्यात आणखी ९ वाहनचालकांचा हेल्मेटअभावी मृत्यु झाल्याने आता पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीचालकांना समुपदेशन प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.

कारवाईसाठी पोलिसांचे भरारी पथक

शहरात विना हेल्मेट पकडलेल्या दुचाकीचालकांना पोलिस गाडीतूनच मुंबई नाका येथील ट्रॅफीक पार्कमध्ये नेले जाणार असून तेथे दोन तासांचा समुपदेशन अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे. दोन तासांच्या अभ्यासानंतरचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पून्हा सुटका होणार आहे. शहर वाहतुक शाखेने हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवार (ता.९) पासून नाशिक शहरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विना हेल्मेटधारी चालकांवरील कारवाईसाठी पोलिसांनी भरारी पथक तयार केली आहे. रस्त्यावर बॅरीगेटींग करुन अशा विना हेल्मेटधारी चालकांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करणार आहेत.

शहरात मुंबई नाका परिसरात नाशिक फर्स्ट संस्थेतर्फे वाहातूक पार्क उभारलेले आहे. तेथे वाहन चालकांना परवाना काढण्यापूर्वी प्रशिक्षणाची सोय असून ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर आता पुढचा भाग म्हणून विनाहेल्मेट चालकांना या केंद्रावर पोलिस गाडीतून आणले जाईल. त्यानंतर संबधितांना वाहातूक पार्क केंद्रात दोन तासाचे समुपदेशन केले जाईल. समुपदेशन झाल्यानंतर तेथील प्रमाणपत्र दाखविल्यानंतच पोलिस जप्त केलेले वाहन परत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT