nmc property tax latest marathi news esakal
नाशिक

Nashik : थकबाकीदारांच्या घरासमोर सोमवारपासून ढोल; सहाही विभागात पथक

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेकडे दिवसेंदिवस थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाने १२५८ निवडक थकबाकीदारांची यादी जाहीर केली. यानंतर आता त्या थकबाकीदारांच्या घरासमोर सोमवार (ता.१७ ) पासून ढोल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांकडून आश्वासन मिळते, त्यानंतर हे आश्वासन हवेत विरत असल्याने जोपर्यंत थकबाकीचा धनादेश प्राप्त होत नाही तोपर्यंत ढोल वाजविला जाणार असल्याची माहिती विविध कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली. (Drums from Monday in front of houses of non property tax payers by NMC Nashik Latest Marathi News)

महापालिकेला शासनाकडून जीएसटीच्या स्वरूपात अनुदान प्राप्त होते. जवळपास साडेनऊशे कोटी रुपयांच्या वर वार्षिक अनुदान मिळते. त्या खालोखाल घरपट्टीच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. थकबाकी जवळपास २०० कोटींच्या आत यंदाच्या आर्थिक वर्षात घरपट्टीतून महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे.

मात्र एप्रिल ते जून या कालावधीत सवलत असल्याने त्यानंतरच्या चार महिन्याच्या कालावधीत अपेक्षित उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले नाही. त्यात निवडणूक कामासाठी घरपट्टी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने वसुलीवर त्याचा आणखीनच परिणाम झाला. नियमित पट्टी वसूल करण्यास ३१ मार्च अवधी असला तरी त्यापूर्वी थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यासाठी विविध कर विभागाने पावले उचलली आहेत.

२५००० पासून थकबाकी असलेल्या एकूण १२५८ थकबाकीदारांवर महापालिकेच्या विविध कर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या थकबाकीदारांना नोटिसा पाठवून विहित कालावधीमध्ये थकीत घरपट्टी भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यापूर्वी थकबाकीदारांकडून सक्तीने वसूल करण्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. ढोल वाजवताना जोपर्यंत थकबाकीचा धनादेश हातात पडणार नाही, तोपर्यंत ढोल वाजवण्याचा कार्यक्रम सुरू राहील. सहा विभागात प्रत्येकी एक असे सहा ढोल पथक नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश दिले जाणार आहे.

असे आहेत विभाग थकबाकीदार

विभाग थकबाकीदार

पूर्व ६००

पश्चिम २००

नाशिक रोड १५३

सातपूर १४२

सिडको १४०

पंचवटी २३

------------------------------

एकूण १२५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT