funeral due to corona.jpg 
नाशिक

#Lockdown :"आईच्या अंत्यविधीला येऊ नका हो...आहे तिथूनच प्रार्थना करा..!"

दिगंबर पाटोळे: सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी :  परिसरात नातेवाईकांचा मृत्यू झाला की, त्याच्या पाहुण्यारावळ्यांना निरोप पोचवला जातो. अंत्यविधीचे  वेळ, ठिकाण सांगितली जाते. तसेच सोशल मिडीयातूनही तसे मॅसेज टाकला जातो. अडचण नको म्हणून वेळेत पोचण्यास सांगितले जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही परिस्थिती बदलली आहे. पाहुण्यांना मृत्यूची बातमी कळविली जात आहे. पण अंत्यविधीला न येण्याचे आवर्जून सांगितले जात आहे. अंत्यविधीचे सोपस्कारही सोशल डिस्टन्सिंग पाळून केले जात आहेत. परिणामी, कोरोनाच्या प्रादुर्भावात मृत्यूही अडचणीचा वाटू लागला आहे. 

मोजक्याच कुटुंबियाच्या उपस्थितीत निर्णय 

वणी येथील किसन (भगत) काळू झोटिंग यांचे पत्नी व शुभम फुटवेअर्सचे संचालक प्रकाश झोटिंग व दिपक झोटिंग यांची आई रखमाबाई किसन झोटिंग, वय ७० यांचे शनिवारी, (ता. २८) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतांना निधन झाले. ही बाब वणी येथे कुटुंबातील सदस्यांना कळाल्यानंतर त्यांनी 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानूसार अंत्यविधी हा मोजक्याच कुटुंबियाच्या उपस्थित करण्याचा निर्णय घेतला. या घटनेची नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली; मात्र अंत्यविधी, रक्षा विसर्जनासाठी येवू नका असे सांगण्यात आले.  तसेच वणी येथील झोटिंग कुटुंबीयांचे भाऊबंद, मित्र परिवार यांनीही याबाबत काळजी घेत, मृत व्यक्तीच्या घरी गर्दी न करता अंत्यविधीचे साहित्य जमवा जमव केली. 

आहे तेथूनच प्रार्थनेचे आवाहन
मृत व्यक्तीच्या घरच्यांकडून नातेवाईक, मित्रपरिवाराची काळजी घेतली जात आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे नातेवाईक, मित्रपरिवाराला आवाहन केले, की कोरोनामुळे रक्षाविसर्जनासह अन्य विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करणे इष्ट नाही. जेथे आहात तेथूनच आमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

घरी गर्दी होईल म्हणून परस्पर अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार

नाशिकहून मृतदेह घरी आणला तर परीसरातील सर्व नातेवाईक व मित्र परीवार जमा होवून गर्दी होईल. अंत्ययात्रोलाही रस्त्यावर गर्दी होण्याची शक्यता गृहित धरुन शववाहिकेतून मृतदेह परस्पर अमरधाम मध्ये नेऊन परस्पर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार घरातील मोजके व्यक्ती अत्यंसंस्कारासाठी अमरधाममध्ये उपस्थित राहून रखमाबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावॆळी स्मशानभूमीत जवळच्या उपस्थित नातेवाईकांना रक्षा विसर्जन व दशक्रिया विधीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच करायचे असून नातेवाईकांनी आपल्या घरुनच श्रध्दाजंली वाहून आमच्या दु:खामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

अंत्यविधी करतांनाही घेतली काळजी..
अंत्यविधीसाठी उपस्थित कुटुंब व नातेवाईकांनी आपल्याबरोबरच इतरांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क व रुमाल बांधला होता. व प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर टाकून दोन व्यक्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून अत्यंविधी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT