Devnadi_pr.jpg 
नाशिक

देवनदीच्या पूरामुळे गुजरातशी संर्पक तुटला

सकाळवृत्तसेवा

देवनदीच्या पूरामुळे गुजरातशी संर्पक तुटला

नाशिक /लखमापूर :  दिंडोरी तालुक्‍यातील पांडाणे येथील देव नदीवर काम सुरु असलेल्या पुलाचा भरावच पावसामुळे वाहून गेल्याने रविवारी सायंकाळपासून गुजरात व महाराष्ट्राचा संर्पंकच तुटला आहे. 

पांडाणे (ता.दिंडोरी) येथे देवनदीवर पूलाचे काम सुरु आहे. हे काम करतांना वाहातूक सुरळित रहावी म्हणून पर्यायी मार्ग म्हणून पुलाच्या बाजूलाच तिन फुट गोलाकार पाईप टाकून पर्यायी मार्ग केला आहे.  पण आज रविवारी सायंकाळी  अचानक झालेल्या पावसाने देव नदीला पूर येउन हा पर्यायी मार्गावरील मोऱ्यांचा भराव वाहून गेला. परिणामी, महाराष्ट्र गुजरात या दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. 

वणी सापुतारा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असतांना पांडाणे येथील देव नदीवरील पुलाचे काम सुरू आहे.नेमके या कामाच्या शेवटच्या मोरीचे स्लॅबचे काम सुरु असतांना आज रविवारी साडे सहाला सप्तश्रृंगी गडावर जोरदार पाऊस झाल्याने देव नदीला महापुर आला. महापूरामुळे देव नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे दोन्ही बाजूचा संपंर्क तुटल्यामुळे वाहतूकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पुलाचे काम पावसाळ्यापुर्वी झाले असते. पण कोरोना विषाणूचा फटका या 
कामाला बसला असून परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात निघून गेल्यामुळे पुलाचे काम रखडले होते. सध्या स्थांनीक मजुरांच्या मदतीने ठेकेदार हे पुर्ण काम करीत असतांना अचानक आलेल्या पावसामुळे रस्ताच वाहून गेल्यामुळे गुजराथ व महाराष्ट्राचा संपर्क तुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: मुंबई-दिल्लीसह अनेक विमानतळांवर हाय अलर्ट! विमान कंपन्यांना बॉम्बस्फोटाची धमकी

तो सेट नव्हे खरा वाडा... धनश्री काडगावकरने सांगितलं कुठे झालेलं 'तुझ्यात जीव रंगला'चं शूट; म्हणाली, 'एसी नाही, मेकअप रूम...'

Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

Women's Weight Gain: स्त्रियांच्या वाढत्या वजनामागे ‘ही’ सवय जबाबदार! डॉक्टर सांगतात धक्कादायक तथ्यं

Latest Marathi Breaking News: घरफोड्या करणारी टोळी गजाआड

SCROLL FOR NEXT