late kiran purane esakal
नाशिक

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने घेतला गळफास

नरेश हाळणोर

नाशिक : उपनगर परिसरातील नाशिक महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. किरण माणिक पुराणे (रा. उपनगर) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी किरण यांनी सोशल मीडियावरून ठेकेदार व सुपरवायझर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व्हायरल संदेशात म्हटले आहे. (Due to harassment of seniors nmc cleaning worker suicide Nashik news)

किरण पुराणे नाशिक महापालिकेत घंटागाडी कर्मचारी होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनगर पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरण यांनी सोशल मीडियावर काही जणांची नावे घेत ठेकेदार आणि सुपरवायझरकडून पैशांवरून त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तसेच, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही त्रास देणे सुरूच होते. या त्रासामुळेच हे कृत्य करीत असल्याचे या संदेशात म्हटले आहे.

या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नातलग व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत व्हायरल संदेशात ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. मात्र, दुपारपर्यंत उपनगर पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या प्रकरणी उपनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

"मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांना तक्रार देण्याचे आवाहन केले. त्यानुसार ते तक्रार देण्यासाठी आले; परंतु तक्रार न देताच निघून गेले. सध्या उपनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे."

- नीलेश माईनकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT