gangapur dam
gangapur dam esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यातील ४३ मंडळामध्ये अतिवृष्टी; धरणसाठा ९० टक्के

विनोद बेदरकर

नाशिक : गुलाब चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. गेल्या चोवीस तास जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तीन दिवसांच्या संततधारेनंतर जिल्ह्यातील धरणं ९० टक्के भरले असून, गंगापूर व दारणा-गिरणासह प्रमुख धरण समूहांतून विसर्ग सुरु आहे.


जिल्ह्यातील २३ धरणांपैकी केवळ भोजापूर, ओझरखेड, तिसगाव हेच धरण भरायचे राहिले आहे. गेल्या चोवीस तासातील पावसात कळवण, देवळा आणि सिन्नर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. साधारण ६५ मि.मी.पेक्षा आधिक पाउस झालेल्या भागातील पाउस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यातील ४३ मंडळात असा पाऊस झाला. चोवीस तासात त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात- ९२, कळवण- ४०, देवळा- ४७.३, येवला- १०५, इगतपुरी- १०९, पेठ- १३२, सिन्नर- २३, मालेगाव- ६५, नांदगाव- ७९, चांदवड- ४३, निफाड- ४०, नाशिक तालुक्यात ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

नाशिक- ६९.१, इगतपुरी- १०९, धारगाव- ११५, त्र्यंबकेश्‍वर- ९२, वेळूंजे- १३०, हरसूल- १५०, कसबे वणी- ६६, कोशींबे- ८२, ननाशी- १४७, पेठ- १३२, जोगमोडी- ११४, कोहोर- १२५, लासलगाव- १३६, देवगाव- १२५, रानवड- ६९, वडनेर भैरव- ६९, येवला- १०५, अंदरसूल- ९१, नगरसूल- १०५, पाटोदा- ११५, सावरगाव- १३६, जळगाव नेउर- १३०, नांदगाव- ७९, मनमाड- ८०, हिसवळ- ८७, जातेगाव- १४७, वेहळगाव- ८२, मालेगाव- ६५, करंजगव्हाण- ६९, झोडगे- ७०, सौंदाणे- ८०, निमगाव- ९१, कौळाणे- ९०, जळगाव निं.- ९०, डांगसौदाणे- ६५, मुल्हेर- ९२, ताहाराबाद- ८३, जायखेडा- ७८, सुरगाणा- १२०, बाऱ्हे- ८८.५, मनखेड- ८०.२, उंबरठाण- ८६.१, बोरगाव- १०५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT