Due to the scorching heat Prosperity of mataka sellers Nashik News esakal
नाशिक

'गरिबांचा फ्रिज' घेण्याकडे कल वाढला; विक्रेत्यांची भरभराट

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोना (corona) पार्श्वभूमीवर फ्रिजमधील (refrigerator) पाणी पिऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच फायदा सध्या माठ विक्रेत्यांना झाल्याने माठ विक्रेते आनंदात असल्याचे दिसून येत आहे. माठ विक्रीतून (Matka selling) चांगला रोजगार हातात पडल्याने तूर्तास तरी पोटाची चिंता मिटली असल्याचे चित्र सध्या नाशिक शहरात दिसून येत आहे. गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाला सध्या मागणी वाढत आहे.

चैत्र महिन्यात कडक उन्हाळ्यात नाशिक शहरात दुपारी कडक ऊन, रात्री उकाडा जाणवू लागला आहे. सहसा रस्ते निर्मनुष्य असतात. माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने सर्दी, पडसे, शिंक यांची लागण व्हायला याच काळात जास्त प्रमाणात सुरवात होते. डॉक्टरदेखील उन्हाळ्यात नैसर्गिक थंड पाणी पिण्यास सांगतात. उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी पिणे टाळा, असे आरोग्य विभागाने सांगितलेले आहे. सध्या कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्रिज ऐवजी लोक आता माठाला पसंती देत आहे. काळे, लाल, वेगवेगळ्या आकार, रंगातील माठ, दही जमवण्यासाठी लागणारी मातीची लहान मोठी हंडी, मातीची पाण्याची बाटली, मातीचा तवा, चमचे यांना चांगली मागणी आहे.

अशा आहेत किमती

माठच्या किमती १५० ते ४०० रुपये, लहान हंडी २०० रुपये, मातीची बाटली २५० रुपयांना मिळत आहे. जीवनावश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आवर्जून नाशिक रोड, देवळाली गाव, उपनगर, गांधीनगर, द्वारका, मुंबई नाका, तिडके कॉलनी परिसर, सातपूर, सिडको, अंबड, पाथर्डी फाटा येथे थांबून माठ व इतर साहित्य खरेदी करीत आहे. थंड पाण्यासाठी घरोघरी माठ हवेच असतात, याच काळात माठ व इतर तत्सम वस्तू खरेदी करण्याला ग्राहक पसंती देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT