mosquitoes  esakal
नाशिक

Mosquito Disease : साठलेल्या पाण्यामुळे डासांचा उच्छाद वाढला; साथीच्या आजारांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

Mosquito Disease : महापालिकेची कृपा आणि रिमझिम पावसाच्या सरी यामुळे शहराच्या विविध भागात वाढलेले खड्डे, अस्वच्छतेमुळे डासांचा उच्छादात वाढ झाली आहे.

त्यातून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. औषध आणि धूर फवारणीची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Due to unsanitary conditions mosquito disease increased nashik news)

शहराच्या विविध भागातील रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी साठण्याचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टसिटी विभागाकडून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणीही खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठत आहे. ड्रेनेजची स्वच्छता झाली नसल्याने काही भागांमध्ये ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर येऊन तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.

याशिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहे. रिमझिम पावसाने कचरा कुजून डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेकडून याकडे लक्ष देत खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, साचलेल्या पाण्यामध्ये औषध फवारणी करावी, ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी, रहिवासी भागांमध्ये औषधांसह दूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहे.

जुने नाशिकसह शहराच्या अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे. महापालिकेकडून दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस अशा समस्यांत वाढ होत आहे. वाढलेल्या साथीच्या आजारांमुळे रुग्णालय रुग्णांनी भरले असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहेत. पावसामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने होणाऱ्या संभाव्य घटना लक्षात घेता विविध प्रकारच्या कॉइल, यंत्र, औषधे, मच्छरदाणी तसेच डास मच्छर मारणारे इलेक्ट्रिक रॅकेट, क्रीम अशा विविध वस्तूंची मागणी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

SCROLL FOR NEXT