Curtains on the hotel near the new bus stand here esakal
नाशिक

Ramzan Festival : रमजान पर्वात मालेगावला खवय्यांची चंगळ! पूर्व भागातील उपहारगृहांवर लागले पडदे

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रमजान पर्व सुरू होताच खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, उपहारगृहांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. यामुळे खवय्यांची चंगळ होत असून मुस्लीम बहूल असलेल्या पूर्व भागातील हॉटेल्स, उपहारगृहांना बाहेरुन पडदे लावण्यात आले आहेत.

रमजानच्या उपवासामुळे एरवी सकाळी नाष्टासाठी लागणाऱ्या हातगाड्या बंद झाल्या आहेत. (During Ramzan Festival Malegaon full of foodies nashik news)

शहरात रमजान पर्वात महिनाभर पूर्व भागातील प्रत्येक हॉटेल, उपहारगृहांवर पडदे लावण्यात आले आहेत. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत हॉटेल, उपाहारगृहांमध्ये ग्राहकांची वर्दळ असते. पूर्व भागातील बहुतांशी नागरिक रमजानचे उपवास करीत आहेत.

सायंकाळी उपवास सोडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडतात. महिनाभर येथे हॉटेल, उपाहारगृहांची देखील दिनचर्या बदलली आहे. सायंकाळनंतर ग्राहकांची गर्दी होत असली तरी रमजानच्या उपवासामुळे या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे.

पूर्व भागात चहा विक्रीच्या दुकानांची रेलचेल आहे. सुमारे तीन हजारापेक्षा अधिक लहान-मोठी चहाची दुकाने आहेत. येथील अनेक भागात रात्रभर चहाची दुकाने सुरु असतात. रमजान पर्वामुळे सकाळी नाश्त्यासाठी लागणाऱ्या हातगाड्यांचा व्यवसाय मंदावला आहे.

खानावळ, अंडाभुर्जी, मिसळ, समोसा, वडापाव, टिकीया, पुलाव, बिर्याणी आदींचा व्यवसाय देखील रात्रीच होत आहे. एकूणच रमजान पर्वामुळे लहान-मोठ्या हॉटेल, उपहारगृह, चहा टपरी आदींच्या विक्रीत एरवीच्या तुलनेने कमालीची घट झाली आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

महिनाभर राहणार पडदे

रमजानचे उपवास करणाऱ्या नागरिकांचा आदर केला जातो. त्यांच्यासमोर खाद्यपदार्थ खाणे टाळले जाते. त्यामुळे येथील हॉटेल, उपाहारगृहांना महिनाभर पडदे लावले जातात. सकाळी फजरच्या नमाजपासून ते उपवास सोडेपर्यत दिवसभर पडदे लावलेले असतात. येथील पूर्व भागातील बहुतांशी नागरीक रमजानचे उपवास करीत आहेत.

"शहरात चहाचे दुकाने, हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आहे. येथे कामगार वर्ग जास्त असल्याने त्यांच्यासाठी हॉटेल जास्तीत जास्त वेळ सुरू ठेवली जाते. रमजान पर्वात लहान हॉटेल दिवसभर बंद असतात. सायंकाळी त्या सुरू होतात." - शेख मुश्‍ताक, संचालक, न्यू मिलन

"आम्ही हॉटेलमध्ये खानावळ चालवितो. रमजान महिन्यात खानावळीवर मोठा परिणाम होतो. दिवसभर ग्राहक येत नाहीत. सायंकाळनंतर ग्राहक असले तरी देखील पुरेशा प्रमाणात व्यवसाय होत नाही." - अख्तर शेख, संचालक, बिस्मिलाह हॉटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT