farmer gajarwadi.jpg 
नाशिक

गाजरवाडीच्या शेतकऱ्याचा आविष्कार! अवघ्या सहाशे रुपयात बनविली डस्टिंग मशीन; एकदा वाचाच

माणिक देसाई

नाशिक / निफाड : द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात द्राक्षवेलींवर महागडे औषधे फवारायचे व ते पावसात धुतले जाते. यावर पर्याय म्हणून डस्टिंग मशिनद्वारे पावडर फवारली जाते. ट्रॅक्टरवरील हे मशिन लाखाच्या घरात जाते. वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांनी बेजार झालेल्या उत्पादकाला दिलासा देणारे तेही अवघ्या सहाशे रुपयात डस्टिंग मशिन बनविण्याचा आविष्कार केला आहे, तो गाजरवाडी (ता. निफाड) येथील युवा शेतकरी दिगंबर गाजरे यांनी. 

अवघ्या सहाशेत डस्टिंग मशिन 
द्राक्षपट्ट्यात खासकरून विविध प्रकारचे रोग येत असल्याने बागांवर फवारणी करण्याची नितांत गरज असते. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे फवारणी करण्यास अनेक अडचणींना शेतकऱ्यास सामोरे जावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गाजरे यांनी घरातील पातेले, डबा, स्क्रू, गलोरीचे रबर, पाइपचा टुकडा आदींच्या सहाय्याने डस्टिंग मशिन तयार केले. स्वत:च्या बागेवर डस्टिंग मशिनद्वारे फवारणी केली. लाखो रुपयांच्या मशिनला अवघ्या सहाशे रुपयांचा पर्याय देत हे मशिन द्राक्षबागांसह डाळिंब बागांसाठीही उपयुक्त असल्याचे गाजरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे मशिन द्राक्षबागेसाठी फवारणी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरवर बसवले जाऊन बागांवर डस्टिंगही केले जाऊ शकते. 

गाजरवाडीच्या शेतकऱ्याने बनवलेले द्राक्ष बागेवरील डस्टिंग मशिन. 


द्राक्षासह डाळिंब पिकांवर पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी शेतकरी आपल्या बागांवर डस्टिंग मशिनद्वारे पावडर फवारणी करतात. याची किंमत १५ हजार ते १ लाखांपर्यंत आहे. मी फक्त सहशे रुपयांत हे मशिन तयार केले आहे. लाखाचे मशिन जे काम करते, तेच काम हे सहाशे रुपयांचे मशिनदेखील करणार आहे. - दिगंबर गाजरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी 

मशिनसाठी लागणारे साहित्य 
२४ ते २६ इंच घमेले 
८ इंच पातीले 
१ इंची काँक 
१.इंची क्लिप 
५ लि काँन्टापचा डबा 
१ गलुरीसाठी लागणारे रबर 
८ स्क्रू  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT