dust on road latest marathi news esakal
नाशिक

धुळीने नाशिककर बेजार; नेत्रविकारांत वाढीची भीती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सततच्‍या पावसानंतर दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तप्त उन्‍हामुळे एकीकडे घामाघूम होत असताना, दुसरीकडे रस्‍त्‍यावरील धुळीने नाशिककर बेजार झाले आहेत.

धुळीमुळे दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. धूलिकणांमुळे नेत्रविकारांमध्ये वाढ होण्याची भीतीही व्‍यक्‍त होत आहे. (Dusty Nashik Fear of increase in eye diseases nashik Latest Marathi News)

जुलैमध्ये सलग तीन आठवडे जोरदार पाऊस झाला. महिना संपत असताना, पावसाने उघडीप दिली असून, पावसाच्‍या काळात झालेल्‍या चिखलाचे रूपांतर आता धूलिकणांमध्ये झाले आहे. शहरासह उपनगरीय भागांमध्ये बहुतांश रस्‍त्‍यांवर धुळीचे साम्राज्‍य बघायला मिळत आहे.

वाहन, कपड्यांसह डोळ्यातही धूलिकण जात असल्‍याने नेत्रविकारांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. धुळीमुळे डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये खाज सुटणे, शिरांना इजा होण्यासारख्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

दुसरीकडे आकाश मोकळे राहत असल्‍याने तप्त उन्‍हाच्‍या झळांचा सामना श्रावण महिन्‍यात नाशिककरांना करावा लागत आहे. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी पावसाने वैतागलेले नाशिककर आता उन्‍हाच्‍या झळा आणि रस्‍त्‍यावरील धुळीने बेजार झाल्‍याचे बघायला मिळत आहे.

किमान तापमान २२ अंशांवर

पाऊस सुरू असताना, तापमानातही घसरण होऊन सायंकाळी हवेत गारवा जाणवत होता. रविवारी (ता. ३१) नाशिकचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शनिवारी (ता. ३०) किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस होते, तर कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT