Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik News: पोलिस आयुक्तालयातर्फेही ‘ई-एक खिडकी’!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अवघ्या दोन आठवड्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

यासाठी गणेश मंडळांना अनेक परवानग्या महापालिका व पोलिस आयुक्तालयाकडून घ्याव्या लागतात.

त्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर, महापालिकेप्रमाणेच पोलिस आयुक्तालयातूनही गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या परवानग्यासाठी ई-स्वरूपात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे. (E One Window by Police Commissionerate Nashik News)

लाडक्या गणरायाची सारेच आतुरतेने वाट पाहतात. येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे.

त्यासाठी गणेश मंडळांना एक ना अनेक परवानग्यांसाठी महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाकडे जावे लागते. महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली आहे. परंतु पोलिस आयुक्तालयात आत्तापर्यंत असे काही योजना नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे मंडळांनी पोलिस ठाण्यात अर्ज केल्यानंतर, त्यानंतर सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अखेरीस आयुक्तालयातून परवानगी दिली जाते.

यंदा मात्र या सार्याला फाटा देत आयुक्तालयाकडूनही इ-स्वरूपाची एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तालयाने संकेत दिले आहेत.

गणेश मंडळांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT