E rights system from July 1 in Dindori nashik news esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरीत 1 जुलैपासून ई-हक्क प्रणाली; हे आहेत फायदे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाच्या ‘ई- चावडी’ प्रकल्पानुसार दिंडोरी तालुक्यात ई- हक्क प्रणालीची १ जुलैपासून अंमलबजाणी सुरू होत आहे. या प्रणालीमुळे खातेदारांना वेगवेगळ्या हक्काच्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

त्यामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकपणा येणार आहे. खातेदारांच्या वेळ, अनाठायी पैशांची बचत होणार आहे. (E rights system from July 1 in Dindori nashik news)

वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, विश्‍वस्तांचे नाव बदलणे आदी आठ प्रकारच्या फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरणांतर्गत ई-हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

त्याची दिंडोरी तालुक्यात १ जुलै पासून अंमलबाजवणी करण्यात येणार असल्याची माहीती दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांना दिली आहे. यासाठी नागरिक व शेतकऱ्यांनी https://pdeigr. maharashta.gov.in/frmlogin.aspx या संकेत स्थळा वर लॉगीन करून अर्ज दाखल करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर तलाठी स्तरावर सदर अर्जा बाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही त्वरित होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाईन अर्ज करतांना पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करताच खातेदाराला अर्जाच्या प्रतीसह संकेतांक क्रमांक मिळेल. त्या आधारे अर्जाची स्थितीही पाहता येणार आहे.'या प्रणालीमुळे अपप्रवृत्तींना आळा बसेल.

सर्वसामान्य शेतकरींना कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. नोंदणीकृत खरेदी दस्तऐवज व्यतिरिक्त इतर सर्व अनोंदणीकृत फेरफारसाठी घरबसल्या अर्ज सादर करता येतील. अनियमितपणाला आळा बसेल, याचा लाभ सर्व शेतकरींनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.

"सर्व शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांनी तलाठीस्तरावरील सर्व अनोंदणीकृत फेरफार अर्ज वरील संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करावेत,त्यातून त्यांचा वेळ वाचेल. पैशांची बचतही होईल." - डॉ. नीलेश अपार, प्रांताधिकारी, दिंडोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT