CSC-Center 
नाशिक

Nashik News: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक मार्फत ई-सेवा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक, मार्फत ज्या उद्योजकांना ई-सेवा (CSC केंद्र) या विषयामध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी दि.२७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ई-सेवा प्रशिक्षण कार्यक्रम प्रात्यक्षिकासह आयोजित करण्यात येत आहे. (E Service Demonstration Training Program through Maharashtra Entrepreneurship Development Center Nashik news)

सदर प्रशिक्षणात ई-सेवा आणि आपले स्वतःचे CSC केंद्र कसे सेट करावे, पॅन कार्ड, आधार स्मार्ट कार्ड, शॉप अॅक्ट लायसन्स, उद्योग नोंदणी, रेशन कार्ड, एमएसएमई नोंदणी, रोजगार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ईपीएफओ, कास्ट- व्हॅलिडिटी, ई-स्कॉलरशिप, आरटीई, आरटीआय फॉर्म, पोलीस/क्लिअरन्स सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र- जीवनप्रण, एनपीएस, सर्व प्रकारचे विमा-सामान्य/आरोग्य/जीवन/पीक सेवा, बैंकिंग कॉमन सर्व्हिस पॉइंट, जीएसटीआर, आयटीआर भरणे, शासकीय योजना आणि कार्यपद्धती उ‌द्योग व्यवसाय साठी आवश्यक शासकीय परवाने वा नोंदणी ई.बाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल.

यशस्वी प्रशिक्षणार्थीना एमसीईडीचे प्रमाणपत्र मिळेल. सदर प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहिती किंवा प्रवेशाकरिता कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मोहिनी गांगुर्डे यांच्याशी ११, उद्योग भवन, आय.टी. आय.सिग्नल जवळ, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक मो. ८७६६७३८३१८ व कार्यालय दूरध्वनी क्र. ०२५३-२९२९७३४९५ वर संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्र, नाशिक यांचे मार्फत करण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT