Nashik Earthquake esakal
नाशिक

Earthquake In Nashik : भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं; रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांत भीती

आज नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Nashik Earthquake : आज (बुधवार) पहाटे नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेलीय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला 89 किमी अंतरावर आज पहाटे 4.4 च्या सुमारास 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

या भूकंपामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. तर यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीती कायम आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं

आज पालघरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिक भयभीत झाले आहेत. पालघरमध्ये आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT