powerloom malegaon.jpg 
नाशिक

मालेगावच्या आर्थिक चाव्या गुजरात अन् राजस्थानच्याच हातात!...कसं ते वाचा

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) कोरोनाला अंगाखांद्यावर घेत महाराष्ट्राचे मॅचेस्टर असलेल्या मालेगावात पुन्हा यंत्रमागाचा खडखडाट वेगाने सुरू होत आहे. हा खडखडाट सुखावणारा असला तरी येथे कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसिंग युनिट नाहीत. येथील 70 टक्के यंत्रमागधारकांना त्यासाठी गुजरात व राजस्थानवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या तरी मालेगावच्या आर्थिक चाव्या गुजरात, राजस्थानच्याच हातात आहेत. 

ऐन सीजनमध्ये लॉकडाउन 

कोरोनामुळे येथील यंत्रमाग अडीच महिने बंद होता. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत हिंदू- मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होतात. यंदा या कालावधीतच रमजान ईदही होती. ऐन व्यवसायाच्या कालावधीतच लॉकडाउन झाल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला. बंद असलेले यंत्रमाग, सायझिंग व प्रक्रिया उद्योग सुरू करताना अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढत हा उद्योग पुन्हा उभारी घेऊ पाहतोय. 

रोज तयार होते दीड व दोन कोटी मीटर कापड 

मालेगावातील दोन लाखांवरील सर्व यंत्रमाग 24 तास सुरू राहिले, तर रोज जवळपास दीड ते दोन कोटी मीटर कापड तयार होते. प्रतिदिन 50 ते 55 ट्रक कापडाच्या गाठी प्रोसेसिंगसाठी गुजरातमधील सुरत, अहमदाबाद राजस्थानातील पाली, बोलोत्रा, जेधपूर व नवी मुंबईतील प्रोसेसिंग युनिटमध्ये जातात. तेथे कापड रंगीत केले जाते. एका ट्रकमध्ये 200 गाठी बसतात. दोन हजार मीटर कापडाची एक गाठ बनविली जाते. प्रक्रियेनंतर हे कापड थेट बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली व कोलकत्ता येथील बाजारात जाते. मालेगावचे 75 टक्के कापड परराज्यातील बाजारात विकले जाते. उर्वरित कापड महाराष्ट्रातील स्थानिक बाजारात इतर कापडांना टक्कर देत तग धरून राहते. सध्या येथे जवळपास निम्मे यंत्रमाग सुरू झाले आहेत. हे प्रमाण दिवसागणिक वाढणार आहे. 

प्रोसेसिंग युनिट सुरू होणे गरजेचे 

मालेगावातील यंत्रमाग सुरू होणे जेवढे गरजेचे आहे. तेवढ्याच प्रमाणात परराज्यातील प्रक्रिया उद्योग सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. सुरत, अहमदाबाद व नवी मुंबईतील युनिट कोरोनामुळे पूर्णपणे बंद आहेत. पाली येथील 20 टक्के, तर बालोत्रा व जेधपूर येथील प्रत्येकी 40 टक्के युनिट सुरू झाले आहेत. या भागातील बिहार व यूपीतील कामगार गावी परतल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे. युनिट मालक कामगार पुन्हा परतण्याची वाट पाहात आहेत. अशा परिस्थितीत मालेगावात तयार होत असलेल्या कापडापैकी केवळ 30 ते 40 टक्के कापडावरच प्रक्रिया होत आहे.

बाकीचे कापड प्रक्रियेच्या प्रतीक्षेत गुदामात आहे. येथे आजपासून आणखी यंत्रमाग सुरू होत आहेत. त्यामुळे उत्पादन वाढणार आहे. अशा परिस्थितीत गुजरात, राजस्थानमधील प्रक्रिया उद्योग सुरू होणे तसेच बिहार, उत्तर प्रदेश, कोलकत्ता व दिल्लीतील कापड बाजार पूर्णपणे सुरू होणे मालेगावच्या हिताचे ठरणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT