RTE google
नाशिक

Education News : RTEसाठी शाळांची नोंदणी सुरू होणार; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू होत असून, सोमवार (ता. २३)पासून शाळांची नोंदणी सुरू होणार आहे. प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

गत वर्षी डिसेंबर महिन्यातच आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारीमध्ये शाळांची नोंदणीप्रक्रियाही पूर्ण झाली होती. यंदाच्या वर्षी मात्र, जानेवारी महिना संपत आलेले असतानादेखील शाळांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले होते.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

अखेर, प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. २३ जानेवारी २०२३ पासून यंदा शाळांची नोंदणी सुरू होणार आहे. शाळांच्या नोंदणी, तर गटशिक्षणाधिकारी स्तरावर पडताळणी केली जाईल. त्यानंतर प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू होईल. १५ फेब्रुवारीनंतर प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यात तीन ते चार टप्प्यात प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया राबविली जाऊ शकते, असा अंदाज आहे.

त्यामुळे सध्यातरी शाळांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत आरटीई प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकीकडे शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली असून, प्रवेशदेखील निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने नाशिकसह राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष प्रवेशाकडे लागले आहे.

गत वर्षी आरटीई शाळा व उपलब्ध जागा

- आरटीईअंतर्गत येणाऱ्या शाळा - ४२२

- २५ टक्के राखीव असलेल्या जागा - ४,९२७

- प्रवेश मिळालेली विद्यार्थिसंख्या- ३,९६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT