union budget 2023 for education sector esakal
नाशिक

Education Sector on Budget 2023 : शिक्षण क्षेत्रात कही खुशी, कही गम’; मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्‍पात शिक्षण क्षेत्राबाबत केलेल्‍या तरतूदी, घोषणांचे शैक्षणिक क्षेत्रातून स्‍वागत करण्यात आले आहे. आगामी नवीन शैक्षणिक धोरणाच्‍या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्‍पात तरतूद वाढविण्यासह शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्‍या विकासासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते, अशी भावनादेखील व्‍यक्‍त केली जाते आहे. त्‍यामुळे काही तज्‍ज्ञांकडून समाधान तर काही तज्‍ज्ञांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जाते आहे. (Education Sector on union Budget 2023 ups and downs Reactions of dignitaries nashik news)

"अर्थमंत्र्यांनी डिजिटलायझेशनवर भर दिलेला आहे. त्‍याअनुषंगाने मविप्रचे आगामी काळात संस्थेच्या होरायझन समूह शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करत इयत्ता पहिलीपासूनच आर्टिफिशियल इंटिलिजिंससह प्रात्यक्षिक अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा विचारात आहोत. कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटिलिजिंस व डाटा सायन्सचे विशेष विभाग सुरू करण्याचा मानस आहे."

- ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस,मविप्र संस्था नाशिक.

"काहीसा युवक धार्जिणे तसेच उद्योजकता आणि रोजगार संधींना वाव देणारा अर्थसंकल्प आहे. निर्यात, पर्यावरणपूरक दळणवळणाला बळ देण्याचा आणि कर पद्धतीमध्ये सहजता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शिक्षण क्षेत्रासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी भरीव काही नसल्‍याने शैक्षणिक क्षेत्राची निराशा झालेली आहे."

- डॉ. रवींद्र सपकाळ, एमडी तथा अध्यक्ष, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

"अर्थमंत्र्यांनी अमृत काळातील बजेटमध्ये सात प्राधान्य क्षेत्रांमध्ये विभागले आहे. शिक्षण क्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक प्रशिक्षण केंद्रामार्फत शिक्षकांच्या सबलीकरणावर भर दिला आहे. ७४० एकलव्य शाळांमध्ये शिक्षक नेमणुकीला प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र स्थापनेची घोषणा केली आहे. इंधनाच्या किमती कमी केल्या असती तर सयुक्तिक झाले असते."

- प्रा. डॉ. नीलेश बेराड, संचालक, मेट्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट.

"‘सबका साथ, सबका विकास’ या घोषवाक्‍यावर कार्यरत केंद्र सरकारने अर्थसंकल्‍पातून मात्र सर्वांची निराशा केलेली आहे. कर सवलतींमध्ये सुधारणांसह काही प्रमाणात योजना चांगल्‍या आहेत. परंतु कृषी, शिक्षण क्षेत्राबाबत निराशाजनक अर्थसंकल्‍प आहे. शेतकऱ्यांसाठी योजना, तरतूदी केलेल्‍या नाहीत. शैक्षणिक क्षेत्राला बळ देण्यासाठी अर्थसंकल्‍पात तरतूद वाढविणे अपेक्षित होते."- राजाराम पानगव्‍हाणे-पाटील, अध्यक्ष, ब्रह्मा व्‍हॅली ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूट.

"नर्सिंग महाविद्यालये सुरू केल्‍याने कुशल मनुष्यबळ निर्मितीला मदत होणार आहे. कौशल्‍य विकास योजनांमुळे रोजगार निर्मितीस मदत होणार आहे. नवतंत्रज्ञानाचा विचार अर्थसंकल्‍पात झालेला दिसतो. 'सबका साथ, सबका विकास' या ब्रीदवाक्‍याला तंतोतंत उपयुक्‍त ठरेल असा सर्व घटकांसाठी उपयुक्‍त सर्वसमावेश असा अर्थसंकल्‍प सादर झालेला आहे."

-हेमंत धात्रक, सरचिटणीस, क्रां. व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT