Disease esakal
नाशिक

Winter Disease : वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर; सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजाराने वाढवली चिंता!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : पावसाळ्यानंतर थंडीने तालुक्यात जोर धरला आहे. पण त्यातच दिवसा उन्हाळा तर सायंकाळी हिवाळ्यासारख्या शीतलहरी शरीराला झोंबत असल्याने याचा सर्व परिणाम हा लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांना होत असून संसर्गजन्य आजाराने डोकेवर काढल्याचे चित्र आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे. (Effect of climate change on health Illness like cold cough fever increased anxiety Winter Disease)

तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. विशेष म्हणजे हिवाळा सुरू झाल्यापासूनच सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले.

वातावरण बदलामुळे त्यात पुन्हा भर पडली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात रुग्ण संख्या वाढली आहे. अनेकजण घरगुती उपचारसुद्धा करीत आहेत. लहान मुलांना सर्दीमुळे कान दुखणे, ताप येणे हे लक्षणे दिसून येत आहे.

धुक्यामुळे वाढतो अधिक त्रास

सकाळच्या सुमारास वातावरणात धुके पडते. याचवेळी बाहेर फिरावला गेल्यास श्वसनावाटे ते धुके शरीरात जाते. या धुक्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढतो. याशिवाय थंडीचे आजारही बळावण्याची शक्यता असते.

त्यामुळे सकाळी फिरताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा. सकाळी कडक थंडी असल्यास बाहेर जाणे टाळावे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढून ताप येतो. ताप वाढत गेल्यास प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

सध्या बाल रुग्णालयात न्यूमोनियाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येते. सर्दी, खोकल्याचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. सध्या सर्दी, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक लहान मुले आहेत. याशिवाय वृद्धांनाही खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

काय काळजी घ्याल - संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे. - लक्षणे दिसताच वेळीच उपचार करावा - सर्दी, खोकला वाढण्याआधीच उपचार घ्यावा.

"कोविड नंतर मुलांच्या प्रतिकारशक्तीमध्ये खूपच बदल झालेला आहे. श्वसनसंबंधी तक्रारी वाढत आहे. तसेच, न्युमोनिया, फ्ल्यूसदृश आजार डोके वर काढत आहे. वातावरणातील बदल, कमी झालेली प्रतिकार शक्ती, आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आजार वाढले आहे. आरोग्य संबंधी तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून औषधोपचार करावे. परस्पर औषधोपचार करू नये." - डॉ. आनंद नागरे, बालरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT