exam results
exam results sakal
नाशिक

CS Exam Result: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्हचा निकालावर परिणाम; जाणकारांचे मत

सकाळ वृत्तसेवा

CS Course Result : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्यातर्फे कंपनी सेक्रेटरीज (सीएस) या अभ्यासक्रमातील सीएस प्रोफेशनल आणि सीएस एक्झिक्युटिव्ह या परीक्षांचा निकाल शुक्रवारी (ता. २५) जाहीर करण्यात आला.

या वर्षी या दोन्ही परीक्षांचा निकाल खालावला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होताना या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. (Effect of CS Professional Executive on Result Expert opinion nashik)

यापूर्वी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीएस प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या पाठोपाठ शुक्रवारी सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह या परीक्षांचा निकालही जाहीर करण्यात आला आहे.

१ ते १० जून या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. नाशिकमधून सीएस एक्झिक्युटिव्ह स्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नताशा भाटिया, चिन्मयी जावळे, प्राची पगारे, सलोनी मेंद, शिवम खांबेकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सीएस प्रोफेशनलचा तिसरा गट (मॉड्यूल ३) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गंधाली आफळे आणि धनश्री क्षत्रिय यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नाशिक येथील सीएस श्रेष्ठी सुराणा यांचे मार्गदर्शन लाभले.

संपूर्ण भारतातील एकूण निकाल कमालीचा घसरला आहे. सीएस प्रोफेशनलमध्ये मॉड्यूल एकमध्ये ९.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर मॉड्यूल दोनमध्ये ७.८६ टक्के आणि मॉड्यूल तीनमध्ये १३.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेच्या मॉड्यूल एकचा निकाल ५.८५ टक्के, तर मॉड्यूल दोनचा निकाल १३.०५ टक्के लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: ''स्वत:ला संत समजू नका''; नाना पटोलेंचे कार्यकर्त्याने धुतले पाय; पाहा व्हिडिओ

बधाई दो! दुसऱ्या लग्नाच्या सात महिन्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री झाली आई; व्हिडिओ शेअर करत सांगितलं बाळाचं नाव

Pakistan World Cup 2024 : पाकिस्तानी कधी सुधारणार ? भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच झाला हतबल, सांगितले ड्रेसिंग रूममधील सत्य

Latest Marathi Live Updates : मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात

UK Heatwave Trending : भारतात तर एवढं एसीचं तापमान असतं..; UK च्या हिट वेव्हवर भारतीयांनी घेतली मज्जा,जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT