Ram Surese Controlled drip irrigation system for various crops from one place.
Ram Surese Controlled drip irrigation system for various crops from one place. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: सूक्ष्मसिंचनाच्या प्रभावी वापराने उन्नती! उजनीच्या राम सुरसे यांचा प्रेरणादायी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : कमी पाण्यात जास्त उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रती थेंब पाणी बचत करून उजनी (ता.सिन्नर) येथील वनश्री पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी राम मोहन सुरसे यांनी मक्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. (effective use of micro irrigation An inspiring experiment by Ujni Ram Surese Nashik Agriculture News)

सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी सुरसे यांनी आपले शेतात ठिबक संचावरती तीन एकर मका, एक एकर भुईमूग, दोन एकर चंदन व मिलियाडुबा, दोन एकर डाळिंब पिकांची यशस्वी लागवड केलेली आहे. तीन एकर डाळींब लागवड नियोजित आहे.

सुरसे यांनी मक्याची लागवड तीन फूट अंतराची सरी पाडून सरीमध्ये शेणखत व कोंबडखत मिश्रित करत केली. नंतर एक फूट अंतरावरती मका बी टाकून ते मातीआड करण्यात आले अन ठिबक संचाद्वारे नियंत्रित पाणी देण्यात आले. यामुळे त्यांना मक्याचे एकरी ४५ ते ५० क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी हे थेट पिकास दिले जाते. ठिंबकमुळे पाण्याची ३० ते ८० टक्के बचत होते. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची जोमदार आणि सतत वाढ होते. पिकाला गरजेनुसार पाणी मिळते.

मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा समन्वय साधला जातो. कमीत कमी वेगाने पाणी दिले जात असल्याने मुळाच्या सभोवती ते जिरते, त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

द्रवरूप खते देता येतात. खताच्या खर्चात 30 ते 35 टक्के बचत होते. खताचा अपव्यय टळून सम प्रमाणात खते देता येतात. जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर तणांवर नियंत्रणास मदत होते.

सुरसे यांना मिळालेले पुरस्कार

जिल्ह्यात दोनशे एकर चंदन शेती लागवड करण्यासाठी सुरसे यांनी इतर शेतकऱ्यांना सहकार्य केले. एक लाखावर वृक्षलागवड केली. परिणामी मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा तयार झाली. त्याचबरोबर मोफत वृक्षलागवड व जनजागृतीचे बहुमूल्य कार्य, रोपनिर्मिती केल्याबद्दल शासनाने वनविभागाचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांचा आदर्श शेतकरी पुरस्कार, कृषी प्रेरणा पुरस्कार, कृषिथॉन युवा शेतकरी पुरस्कार, गोदागौरव पुरस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT