Accident News Esakal
नाशिक

Accident News: अपघातांचं सत्र सुरूच! आयशरची कंटेनरला धडक; अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू

सकाळपासून हा तिसरा भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज सकाळपासून अपघातांचं सत्र सुरूच आहे. सकाळपासून हा तिसरा भीषण अपघात आहे. नाशिक शहरात भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. आज सकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.

नाशिक शहरात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत. अशातच नाशिक मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. आडगाव द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात झाला असून यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा तपास पंचवटी पोलिसांकडून करण्यात येत आहे. जखमी कंटेनरचा चालकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर आयशर हा बंद अवस्थेत उभा होता. सकाळच्या सुमारास कंटेनरने आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनरच्या चालकाच्या सोबत ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता आणि याचवेळी नाशिक शहरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT