A Muslim community member giving a letter to Assistant Police Inspector Nilesh Bodkhe esakal
नाशिक

Nashik News: ‘ईद ए मिलाद’चा जुलूस 29 सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हिंदूधर्मियांचा प्रमुख उत्सव असलेला अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव २८ सप्टेंबरला एकाच दिवशी आल्याने सामाजिक शांतता अबाधित राहावी.

दोन्ही धर्मातील ‘भाईचारा’ टिकून राहावा, यासाठी वणीतील मुस्लीम बांधव व पंच कमिटीने बैठक घेऊन गणेश विसर्जनानंतर २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Eid e Milad procession on September 29 Appreciable decision of Muslim brothers in Vani Nashik News)

धर्माच्या नावावर सर्वत्र राजकारणाची पोळी शेकली जात असताना, वणी येथे धार्मिक एकतेचे दर्शन बघायला मिळाले आहे. मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस प्रशासनाच्या डोक्याच्या मोठा ताण कमी झाला आहे.

वणी परीसरात गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. १९ सप्टेंबरला गणपतीची प्रतिष्ठापना होईल. २८ ला अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जाईल. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेश विसर्जनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच आपलाही उत्सव तितक्याच आनंदात साजरा करता यावा, म्हणून मुस्लीम समाजातील पंचकमिटीने प्रस्ताव मांडला व त्यास सर्व मुस्लिम बांधवांनी एकमताने पाठिंबा दर्शविला व वणी पोलिस ठाण्यात पंच कमिटी सदस्यांनी येऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांना ईद ए मिलादचा उत्सव २९ सप्टेंबरला सकाळी नऊनंतर साजरा करणार असल्याचे पत्र दिले.

या वेळी ऐजाज पठान, बब्बू शेख, बंटी सय्यद, नियाज शेख, फईम शेख, आयुब मुल्ला, रमीज काजी, आरीफ शेख, मुजीब दादा आदी उपस्थित होते.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी मुस्लिम बांधवाच्या भूमिकेचे कौतुक व अभिनंदन केले. यापूर्वीही मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT