Artists present at 'Sakal' office on Wednesday to have discussion regarding upcoming Marathi film 'Ekdam Kadak'. esakal
नाशिक

Nashik News : कलावंतांनी साधला ‘एकदम कडक’ संवाद; 2 डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जाऊ लागले आहेत. अशाच स्‍वरुपातील अनोखा चित्रपट ‘एकदम कडक’ २ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त चित्रपटातील कलावंतांनी बुधवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत संवाद साधला. या कलावंतांच्‍या चमूने ‘सकाळ’ सातपूर कार्यालयास भेट देताना सकाळ- तनिष्का भगिनींशी दिलखुलास संवाद साधला. (ekdum kadak marathi movie cast meet with tanishka at sakal satpur office nashik Latest Marathi News)

दिग्दर्शक गणेश शिंदे यांच्‍यासह चित्रपटातील कलावंत तानाजी गलगुंडे, चिन्‍मय संत, रुक्‍मिणी सुतार, भाग्‍यश्री मोटे आदी उपस्‍थित होते. सातपूर येथे झालेल्‍या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संयोजन तनिष्का समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी केले. याप्रसंगी डॉ. सोनाली पाटील, डॉ. उज्ज्वला निकम, छाया पाटील, रोहिणी भामरे, अर्चना पाटील, कविता मेणकर, सारिका विटोरे, सुमन हिरे आदी तनिष्का सदस्‍य उपस्‍थित होते.

चित्रपटाविषयी माहिती देताना श्री. शिंदे म्‍हणाले, चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि नृत्यांगना मानसी नाईकच्या ‘मॅडम कडक हाय’ गाण्यावरील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकदम कडक नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेल. पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन आणि उमेश गवळी यांनी सांभाळली आहे.

गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी सांभाळली आहे. दरम्‍यान या संवाद कार्यक्रमादरम्‍यान तानाजी गलगुंडे याने आपल्‍या 'सैराट' चित्रपटातील रंजक अनुभवांची माहिती देताना दिलखुलास गप्पा मारल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT