Department of Tribal Development esakal
नाशिक

Eklavya Ashram School Case : मुदतीआधीच आदिवासी आयुक्तांकडून अनुसूचित जनजाती आयोगाला खुलासा सादर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील पंचवटीतील एकलव्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्नपुरवठा झाल्याप्रकरणी अनुसूचित जमाती आयोगाने बजावलेल्या नोटिशीचा आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी मंगळवारी (ता.२४) तत्काळ खुलासा सादर केला.

आयोगाने आयुक्तालयास तीन दिवसांची मुदत दिलेली असताना त्यांनी तातडीने यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आयोगाला सादर केला. (Eklavya Ashram School poor food Case Disclosure submitted by Tribal Commissioner to Scheduled Tribes Commission before deadline)

एकलव्य निवासी शाळेला मुंढेगाव येथील सेन्ट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जाते. मात्र, विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार ७ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. त्यावेळी तब्बल साडेतीनशे संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकत, आंदोलन केले होते.

केवळ कागदोपत्री सोयी सुविधांचे सोपस्कार पूर्ण करून गरीब आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी संघटनांनी केला होता. या प्रकरणाची थेट राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

तक्रारींचा दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने संबंधित शाळेची पाहणी देखील केली होती. त्यानंतर, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे व जिल्हाधिकारी गंगाथरण डी. आदींना नोटिसा बजाविली होती.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

निकृष्ट जेवणासंदर्भातील आरोपांबाबत तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यासाठी आयोगाने तीन दिवसांची मुदत दिली होती. परंतु, नोटीस प्राप्त झाल्यानंतर तत्काळ आदिवासी विकास आयुक्त गुंडे यांनी या संदर्भात केलेली कार्यवाही आणि घेतलेली दक्षता या बाबतचा सविस्तर अहवाल आयोगाकडे पाठविला आहे.

एकलव्य आश्रमशाळेतील कथित घटनेप्रकरणी आयुक्तालयाने तातडीने संबंधित सेंट्रल किचनला भेट देऊन तेथील स्वयंपाकाच्या दर्जाची माहिती घेतली होती तसेच संबंधित संचालकाला नोटीस बजावत काही सुधारणा सुचविल्या होत्या.

कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या सुधारणेबाबतची पडताळणी अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडूनही वस्तुस्थिती जाणून घेतली होती. ४२ आश्रमशाळांना आहार दिला जातो येथे कोठेही तक्रार नसून केवळ या शाळेत तक्रार असल्याने त्यांची चौकशी केली असल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT