Accident News esakal
नाशिक

Nashik : दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार

नरेश हाळणोर

नाशिक : औरंगाबाद रोडवरील जनार्दन स्वामी आश्रमाजवळ रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला ठार झाल्याची घटना घडली. अंजनाबाई रामनाथ काकड (७२,रा. जायेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. (Elderly woman killed in two wheeler collision Nashik Latest Marathi News)

गेल्या गुरुवारी (ता. १०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अंजनाबाई व रामनाथ काकड हे दोघे औरंगाबाद रोडवरील जनार्धन स्वामी आश्रमाजवळ असलेल्या आयकॉन स्टाईलसमोर असलेल्या बसथांब्यासमोरून रस्ता क्रॉस करीत होते. त्यावेळी समोरून आलेल्या दुचाकीने अंजनाबाई यांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी समृद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसात डॉ. पंकज करनकाळ यांच्या तक्रारीनुसार अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहायक उपनिरीक्षक टी. के. गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT