election
election esakal
नाशिक

Election 2022 : पिंपळगाव ग्रामपंचायतीची रणसंग्राम सुरु

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावच्या शहरातील कोणतीही निवडणूक म्हटली की, राजकीय संघर्ष धारधार हे समीकरण आहे. बनकरांमधील राजकीय हाडवैर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतो. यंदाच्या पिंपळगावच्या ग्रामपंचायतीचा रणसंग्राम न भूतो, न भविष्यही.. असाच ठरण्याची चिन्ह अधिक आहे. कारण आमदार दिलीप बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या पारंपारिक संघर्षात भाजपाचे युवा नेते सतीश मोरे यांनी उडी घेतल्याने निवडणुकीने अनपेक्षित अन अंदाज बांधता न येणारे वळण घेतले आहे. प्रचाराचा धुरळा सर्वच पातळीवर कमालीच्या उंचीवर पोचलेला दिसतो.

नगरपरिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी सर्वपक्षीय बहिष्कारामुळे निवडणूक होणार नाही असे चित्र उभे राहीले होते. मात्र अळवरचे पाणी ठरले. आणि सुरू झाला राजकीय अस्तित्वाचा अन प्रतिष्ठेचा रणसंग्राम. प्रारंभी हवा आपलीच असा माहोल निर्माण करून भास्करराव बनकर यांनी प्रतिस्पर्धी यांचे धाबे दणाणून सोडले. त्याचे कारण सर्वच वॉर्डातील बहुतांश उमेदवार तुल्यबळ आहेत. विरोधकांना कडाक्याच्या थंडीत राजकीय चालीने घाम फोडणाऱ्या भास्करराव बनकर यांनी प्रचारा शुभारंभा प्रसंगी अपेक्षीत शक्ती प्रदर्शन केले नसल्याची चर्चा आहे. अर्थात त्यामागे सोसायटीच्या निवडणुकीसारखा गनिमी कावा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय बनकर यांनी भाषण त्यांच्या आक्रमक स्वभावानुसार न करता राजकीय मुत्सद्दीपणा दाखविला.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

आमदार दिलीप बनकर यांनी गत पाच वर्षात ग्रामपंचायत सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामाचा पाढा वाचला. काळीरात्र हा भास्कररावाचा शब्द आमदार बनकर यांना मात्र भलताच जिव्हारी लागला आहे. निवडणूक टळणार यामुळे काहीसे बेसावध राहिलेले आमदार बनकर यांनी तोडीस तोड उमेदवार देऊन आव्हान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे सरपंचपदासाठी भास्करराव बनकर यांच्या विरोधात पुतणे गणेश बनकर यांना उमेदवारी देऊन हायहोल्टेज ड्रामा निर्माण केला आहे. अप्रत्यक्षपणे या सामन्यात सरपंचपदासाठी आमदार बनकर हे उमेदवार असल्यासारखे सर्व वॉर्डात टाईट फिल्डींग लावत आहे.

युवा पर्वाचा उदय करू पाहणारे सतीश मोरे यांनी प्रचारात शुभारंभात अनपेक्षित गर्दी खेचून प्रतिस्पर्ध्यांना ‘हम भी कम नही’..चा संदेश दिला. धनशक्ती अन दहशत यावरून आमदार बनकर व माजी

सरपंच बनकर यांच्या टीकेची झोड उठविली. स्पर्धेत वाटत नसलेले मोरे यांनी निवडणुकीतील सर्व अस्त्र वापरण्याची तयारी केल्याने तिरंगी सामना आता अधिक रंगतदार स्थिती आला आहे. सरपंचपदाच्या चौथ्या उमेदवार आहेरराव यांना वॉर्डातील सदस्यांसाठी उमेदवारच नसल्याने ते चमत्कार घडविण्याची शक्यता वाटत नाही.

प्रचाराच्या शुभारंभात तीनही गटाने ताकद लावलेली दिसली. पण वॉर्डातील उमेदवार किती मत खेचतात यावरच सरपंचपदाचा फैसला असेल. सतीश मोरे यांचा आमदार बनकर गटाशी काडीमोड होऊन मतविभागणी भास्करराव बनकर यांच्या पथ्यावर पडले असा बांधला जाणारा कयास अचूक ठरेल याची खात्री नाही. निवडणूक जवळ येईल तशी हवा कुणाची याचे चित्र स्पष्ट होईल.

एस.टी., रोडरोलर पळणार की शिट्टी वाजणार

सध्या तीनही पॅनलला मिळालेल्या निशाण्याची शहरात जोरदार चर्चा आहे. माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी परिवहन मंडळाचे संचालक पद भुषविल्याचा संदर्भ पडून स्वतः एसटी बस निशाणी घेत सदस्यपदाच्या उमेदवारांना रिक्षा, मोटारगाडी, ट्रॅक्टर अशी वाहनाची निवड केली. सर्वसामान्यांची ही वाहने घेताना पॅनलचे नामकरण दिव्य विकास करून पिंपळगावकराना मोठे स्वप्न दाखविले आहे. तर आमदार बनकर यांचा राजकीय श्रीगणेशा शहर विकास आघाडी माध्यमातून सन १९९७ मध्ये झाला होता.

तेच नाव पॅनल घेत सरपंचपदासाठी गतवेळची रोडरोलर निशाणी कायम ठेवताना किटली, कपाट, कपबशी अशी घेतली. सतीश मोरे यांनी स्वतः शिट्टी घेत उमेदवारांना छत्री, टिव्ही, नाऱळच्या निशाणीवर नशीब अजमावयला सांगितले आहे. एस.टी., रोडरोलर पळणार कि शिट्टीचा गजर होणार याचीच चर्चा शहरभर सध्या सुरू आहे.

एकाच मंडपात तीन सभा...

कोणतीही निवडणुक धडकी भरविणार असली तरी गमती जमती घडत असतात. प्रचाराचा शुभारंभ तीनही पॅनलने वेशी जवळील मंदिरातील सिद्धिविनायकाला विजयासाठी साकडे घातले. बाप्पा कुणाला पावणार हे २० डिसेंबरला समजेल. मंदिर बरोबरच प्रचारासाठी सभामंडप अन माईक तीनही पॅनलने एकच वापरला. सभेप्रसंगी व्यासपीठा मागील होर्डिंग बदलत होते. बीएमडब्लुच्या मंडप मालकाने ही किमया केल्याची गमतीने बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT