electricity.jpg
electricity.jpg 
नाशिक

बंद काळात खासगी क्लासला चक्क साडेपाच लाखांचे वीजबिल; मीटर तपासणीसाठी पाठविले

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : लॉकडाउनच्या काळात बंद असलेल्या गरुडझेप ॲकॅडमीचे एका महिन्याचे विजेचे बिल तब्बल साडेपाच लाखांच्या वर आल्याने आश्चर्य व्‍यक्त होत आहे. 

गरुडझेप ॲकॅडमीकडून तक्रार; मीटर तपासणीसाठी पाठविले 

एकीकडे लॉकडाउनमुळे हैराण झालेल्या खासगी क्लासचालकांचे कंबरडे मोडले असताना गरुडझेप ॲकॅडमीचे केवळ एका महिन्याचे वीजबिल तब्बल साडेपाच लाख रुपये आल्याने सर्वांनाच धक्का बसला. यासंदर्भात ॲकॅडमीचे जनसंपर्क अधिकारी एल. के. डोळस यांनी त्रिमूर्ती चौकातील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात यासंदर्भात तक्रार अर्ज करून स्पष्टीकरण मागितले आहे. बिलाची रक्कम ऐकून संबंधित अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करत घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मीटर काढून ते तपासणीसाठी पाठविले आहे. मीटरमध्ये काही गडबड असल्यास ॲकॅडमीला तातडीने कळविण्यात येईल, असे क्लासचालकांना सांगण्यात आले. 

गरुडझेप ॲकॅडमीची शाखा बंद असताना साडेपाच लाखांपर्यंत बिल येणे म्हणजे एखाद्याला हार्टॲटॅक येण्यासारखेच आहे. एकतर खासगी क्लासेस बंद असताना त्यात महावितरणचे नावाच्या सर्व बिल येणे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असल्यासारखे आहे. - प्रा. सुरेश सोनवणे, संचालक, गरुडझेप ॲकॅडमी 

गरुडझेप ॲकॅडमीचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. वीज कर्मचाऱ्यांना तेथे तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार तेथील मीटर काढून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील बाब स्पष्ट करण्यात येईल. - अर्चना मोरे, अभियंता, वीज वितरण कंपनी, त्रिमूर्ती चौक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT