raut-nitin.jpg 
नाशिक

''वीजबिलात स्थिर व मागणी आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच उद्योग व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे वीजबिलात स्थिर व मागणी आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आला असून, त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल

लॉकडाउनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर व मागणी आकार माफ करावा, अशी मागणी औद्योगिक, तसेच वाणिज्य ग्राहकांनी केली होती. ही मागणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मान्य केली आहे. "एएमआर'तर्फे मीटर रीडिंग उपलब्ध असल्यास त्या ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बिल देण्यात येईल. मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात येईल. मेमध्ये एएमआरमार्फत वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल. 

एप्रिलचे वीजबिल भरण्यासाठी 31 मे अंतिम मुदत

लॉकडाउनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार आहे. तत्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डिजिटल पेमेंटच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू असून, मार्च महिन्याचे बिल भरण्यास 15 मेपर्यंत सवलत दिली आहे. एप्रिलचे वीजबिल भरण्यासाठी 31 मे अंतिम मुदत आहे. ग्राहकांनी वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT