nashik road railway station.jpg 
नाशिक

'या' रेल्वेस्थानकात होणार विजेच्या वार्षिक खर्चात होणार बचत...!

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) रेल्वे विभाग सध्या खर्चाची बचत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने नाशिक रोड रेल्वेस्थानकात सौरऊर्जा पॅनल बसविण्यासाठी मागील आठवड्यातच रेल्वेच्या तांत्रिक विभागाने सर्वे केला. काही दिवसांत रेल्वेस्थानक सौरऊर्जेवर चालविण्यात येणार असून, रेल्वेच्या खर्चाला काही प्रमाणात लगाम लागणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

रेल्वेस्थानकातील पार्किंगमध्ये सौरऊर्जा पॅनलची व्यवस्था

रेल्वे सध्या हायटेक होत असून, प्रवाशांना दर्जात्मक व गुणात्मक सेवा देण्याबरोबरच रेल्वेच्या एकूण महसुलात वाढ झाली पाहिजे व दैनंदिन खर्च नैसर्गिक स्रोतांपासून निर्माण झाला पाहिजे, यावर काम करत आहे. त्यादृष्टीने रेल्वेस्थानकातील पार्किंग मध्ये सौरऊर्जा पॅनलची व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर एक ते तीन फलाटावर सौरऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहे. याद्वारे संपूर्ण नाशिक रोड रेल्वेस्थानकाची वीज निर्माण करण्यात येणार आहे. 

येथे होणार वापर
 
फलाटावरील अधिकाऱ्यांच्या खोल्या, अभ्यांगतांसाठी स्वागत कक्ष, महिला व पुरुषांसाठी आराम खोल्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या खोल्या, कॅन्टीन, विजेचे दिवे, खांब, स्पिकर, तिकीट घर, तिकीट बुकिंग कार्यालय, स्वच्छतागृहे, रेल्वे पोलिस कार्यालय, आरपीएफ विभाग, सीसीटीव्ही नियंत्रण कक्षासह विजेवर चालणारे किरकोळ उपकरणे चालविण्यात येणार आहेत. 

आर्थिक बचत 

सौरऊर्जा पॅनलमुळे रेल्वेस्थानकाच्या एकूण महसुलात वाढ होणार असून, खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. रेल्वेस्थानक 24 तास प्रवाशांसाठी खुले असते. त्यामुळे येथे दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होते. प्रवाशांपासून ते रेल्वे अधिकारी-कर्मचारी, व्यावसायिकांपर्यंत वीज खर्च होते. मागच्या आठवड्यात रेल्वेच्या तांत्रिक विभागाने सौरऊर्जा पॅनलचा सर्वे केला असून, बसविण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याची माहिती भुसावळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती अत्यावश्‍यक असून, रेल्वेच्या सर्व कार्यालयांवर हा नैसर्गिक स्रोत तयार करायला हवा. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या विजेचा खर्च कमी होणार आहे. - ज्ञानेश्‍वर चव्हाण, प्रवासी 

रेल्वेस्थानकात सौरऊर्जा पॅनल बसविण्याचा प्रयोग नक्कीच आदर्श ठरणार असून, इतर सरकारी विभागातही सोलर पॅनल बसवायला हवे. - राहुल तुपे, नागरिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT