Electricity Meter esakal
नाशिक

Nashik News: धक्कादायक! मालेगावात चक्क वीज मीटर ‘क्लोन’; मालेगाव पॉवर सप्लाय लि. कंपनी अवाक

वीजचोरांची शक्कल आणि वाढती हिंमत पाहून पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय वीजचोरांना पायबंद घालणे अशक्य असल्याचे चित्र मालेगावमध्ये दिसून येते

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : वीजचोरीचे अनेक प्रकार, छेडछाड आपण ऐकली, पाहिली असेल. पण मालेगावमध्ये वीज मीटर ‘क्लोन’ करून वीजचोरी होत असल्याच्या प्रकाराने मालेगाव पॉवर सप्लाय लि. कंपनीही अवाक झाली.

वीजचोरांची शक्कल आणि वाढती हिंमत पाहून पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय वीजचोरांना पायबंद घालणे अशक्य असल्याचे चित्र मालेगावमध्ये दिसून येते. (Electricity meter clone in Malegaon Power Supply Ltd Company in trouble Nashik News)

वीजचोरांचे सगळ्यात प्रबळ आणि आवडते ‘टूल’ म्हणजे ‘रिमोट’. ‘रिमोट’द्वारे छेडछाड केलेले मीटर ‘ऑपरेट’ करून ते चालू-बंद करण्याची एक प्रचलित पद्धत वीजचोरांना माहीत आहे. बहुतेक वीजचोर या पद्धतीचा अवलंब करताना पकडते जातात.

काही वीजचोर दिवसा वीज मीटर सुरू ठेवून रात्री ते बंद करण्याचा मार्ग अवलंबतात. आता त्याच्याही पुढे जाण्याचा प्रकार मालेगावच्या वीजचोरांनी अवलंबलेला दिसून येतो. थेट वीज मीटरचा ‘क्लोन’ करून ते वीज चोरीसाठी वापरले जात आहे.

मीटर रीडिंग करणारे कर्मचारी दर महिन्याच्या १ ते १० तारखेदरम्यान येतात. या दहा दिवसांमध्ये वीज कंपनीचे मीटर तसेच ठेवले जाते. तर १० तारखेनंतर ‘क्लोन’ केलेले दुसरे मीटर वीजचोरांकडून बसविले जाते.

वीज कंपनीला १० दिवस ‘करंट’ व्यवस्थित ‘ट्रेस’ होतो, नंतर मात्र पुढचे २० दिवस वीज मीटर रीडिंग काही केल्या पुढे सरकत नाही, त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मालेगाव शहरात असे अनेक ‘क्लोन’ मीटर कंपनीने कारवाई करून सील केले आहेत.

आकडे टाकणारे ‘एजंट’

मालेगाव शहरात आकडे टाकून देणाऱ्या ‘एजंट’ची टोळी सक्रिय आहे. या ‘एजंट्स’ची संख्या १२ ते १५ च्या दरम्यान आहे. वीज महामंडळाची जेव्हा वीज मालेगाव शहरात होती तेव्हापासून हे ‘एजंट’ आकडे टाकून अवैधरीत्या वीज मिळवून देण्याचे काम करत आहेत.

वीज महामंडळाकडून जेव्हा मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी लि. कडे सूत्रे आली, त्यानंतरही हे ‘एजंट’ सक्रिय आहेत. जोपर्यंत या ‘एजंट’ मंडळींचा पुरता बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आकडे टाकून होणारी अवैध वीजचोरी थांबणे कठीण आहे.

त्यासाठी पोलिसांची खंबीर साथ कंपनीला मिळायला हवी. वीजचोरांविरुद्ध कठोर कलमे लागायला हवीत. थेट कारवाई झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात होणारी वीजचोरी थांबणार नाही. हे अनधिकृत बाहुबली एजंट थेट मेन सप्लायमधून वीजचोरी करतात.

६५ टक्के मीटरमध्ये छेडछाड

जिथे मीटर लावले जाते तिथे मीटरमध्ये छेडछाड करणारेही लोक मोठ्या प्रमाणात आहेत. एकूण मीटरपैकी तब्बल ६० ते ६५ टक्के मीटरमध्ये छेडछाड करतात. काहीवेळा शिबिर लावून कुठलीही दंडात्मक कारवाई न करता मीटर बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर वीजचोरी होणार नाही, अशी खात्री कंपनीला होती. सुरवातीचे काही दिवस वीजबिले व्यवस्थित दिसायला लागली, मात्र नंतर पुन्हा अवघ्या आठ-दहा दिवसांत तीच स्थिती बनून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT