nitin_gadkari.jpg
nitin_gadkari.jpg 
नाशिक

नितीन गडकरी म्हणाले, ''येत्‍या पाच वर्षांत 2 कोटी महिला उद्योजिका घडवायच्‍या आहेत''

अरुण मलाणी

नाशिक : आगामी काळात जीडीपीच्‍या चाळीस टक्‍के वाटा या क्षेत्राचा करताना एकूण निर्याती साठ टक्क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्‍याकरिता महिलांचे पाठबळ लागणार आहे. सध्या सुमारे ८० लाख महिला उद्योजिका योगदान देत असून, येत्‍या पाच वर्षांत दोन कोटी महिला उद्योजिका घडवायच्‍या आहेत. त्‍याकरिता स्‍वयंशक्‍तीसारख्या संस्‍थांनी महिलांना कौशल्‍याधिष्ठित प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

येत्‍या पाच वर्षांत दोन कोटी महिला उद्योजिका घडवायच्‍या...

ग्रामीण, दुर्गम भागात अतिशय सुबक कला आहेत; परंतु त्‍यांना हवे तसे व्‍यासपीठ उपलब्‍ध होत नाही. सध्या राष्ट्रीय सकल उत्‍पन्न (जीडीपी) मध्ये लघु-सूक्ष्म उद्योगांचे योगदान तीस टक्‍के असून, एकूण निर्यातीत ४८ टक्‍के वाटा आहे. येत्‍या पाच वर्षांत दोन कोटी महिला उद्योजिका घडवायच्‍या आहेत. त्‍याकरिता स्‍वयंशक्‍तीसारख्या संस्‍थांनी महिलांना कौशल्‍याधिष्ठित प्रशिक्षण द्यावे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. स्‍वयंशक्‍ती या संस्‍थेतर्फे स्त्री उद्यमी फाउंडेशनच्‍या सहकार्याने झालेल्‍या ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बोलत होते. स्‍वयंशक्‍तीच्‍या संस्‍थापिका प्रा. दीपाली चांडक, उपाध्यक्षा स्‍वाती शाह, शीतल देसाई आदी सहभागी झाले होते. 

स्‍थानिक उत्‍पादने बाजारपेठांमध्ये स्‍पर्धा करू शकतील

गडकरी म्‍हणाले, की निर्यात वाढविताना आयात घटविण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. व्‍हिलेज इंडस्‍ट्री या ग्रामीण भागातील क्षेत्रात मोठी उलाढाल असून, येथे प्रामुख्याने महिलावर्गाने लावलेल्‍या हातभारातून छोट्या स्‍वरूपाचे उद्योग उभे राहिलेले आहेत. या घटकांच्‍या विकासासाठी कौशल्‍य विकासावर भर दिला जात असून, चांगल्‍या यशोगाथा आगामी काळात निश्‍चित समोर येतील. दळणवळणासाठी जलमार्गाच्‍या वापरावर भर देण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त करताना, या माध्यमातून वाहतुकीवरील खर्च कमी होऊन उत्‍पादनाच्‍या दरांमध्ये घट होईल व स्‍थानिक उत्‍पादने शहरांतील बाजारपेठांमध्ये स्‍पर्धा करू शकतील, असा विश्र्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT