corona policy esakal
नाशिक

Sakal Impact : कोरोनात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 'विमाकवच’ला अखेर मुदतवाढ

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना संसर्गामध्ये (corona virus) जीव गमवाव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमाकवच (policy) देण्याचा निर्णय राज्य सरकारने (state government) २९ मे २०२० ला घेतला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबरला संपल्यावर ३१ डिसेंबरपर्यंत ती मुदतवाढ देण्यात आली होती. पण, त्यानंतर मृत्यूला कवटाळलेल्या कर्मचाऱ्यांच्या विम्याचा गंभीर प्रश्‍न तयार झाला होता. त्यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने (Sakal Impact) प्रसिद्ध केले होते. याच अनुषंगाने राज्य सरकारच्या अर्थ विभागाने १ जानेवारी ते ३० जून २०२१ पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कर्मचारी विमाकवच’ला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

विमाकवच योजनेला मुदतवाढ मिळाल्याने डिसेंबरनंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. याशिवाय विमाकवच मिळाल्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अधिक प्रभावीपणे काम करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्र सरकारने आरोग्यसेवा संबंधित कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना आखली होती. पण जिल्हा प्रशासन, पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोशागरे, अन्न व नागरीपुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात सक्रीय राहिले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपयांच्या विमाकवचची योजना आखली होती.

कोरोनात कर्तव्य बजावणाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या अर्थ विभागाचा निर्णय

सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध चाचणी, उपचार व मदतकार्य याच्यासंबंधित कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमाकवच पुरवण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य कुटुंबीयांना देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यासाठी संबंधित कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या अगोदर १४ दिवस कामावर हजर असला पाहिजे. मृत्यू कोरोनाने झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी, बाह्यस्त्रोत, रोजंदारी, मानसेवी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT