Nashik Municipal Corporation Sakal
नाशिक

नाशिक : कारवाईचा बडगा उगारताच कर्मचाऱ्यांची यादी हातात

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील १३० शासकीय व निमशासकीय संस्थांशी पत्रव्यवहार निवडणुकीसाठी उपलब्ध होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती. परंतु, निवडणूक तारखांच्या घोळाचा लाभ घेत १३० संस्थांनी कर्मचाऱ्यांची यादी न कळविता असहकार सुरू केला. त्यामुळे प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याची नोटीस काढताच गुरुवारी (ता. १९) अखेर आठ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी यादी सादर करण्यात आली.

महापालिका निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. परंतु, त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयारी करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीसाठी एका बूथवर पाच याप्रमाणे सोळाशे बूथवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आठ हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता, तसेच अतिरिक्त वीस टक्के सोळाशे असे एकूण नऊ हजार सहाशे कर्मचारी निवडणूक कामासाठी लागणार असल्याने महापालिका प्रशासनाकडून शासकीय व निमशासकीय अशा ४५० संस्थांकडून कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली. परंतु, अद्यापपर्यंत शासकीय संस्थांकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने गेल्या आठवड्यात गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. कुठलाच प्रतिसाद न देणाऱ्या १३० संस्थांना नोटीस बजावल्यानंतर त्यातील सत्तर टक्के संस्थांनी प्रतिसाद दिल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. आठ हजार कर्मचाऱ्यांची यादी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. दरम्यान, नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT