Nashik Job Fair  esakal
नाशिक

Nashik Job Fair : 3 हजारांपेक्षा जास्‍त जागांसाठी महेश भवनमध्ये आज रोजगार मेळावा

समर्पण बहुद्देशीय संस्थेतर्फे गुरुवारी (ता. १५) सकाळी अंबड-सिडको लिंकरोडवरील महेश भवन येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Job Fair : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि समर्पण बहुद्देशीय संस्थेतर्फे गुरुवारी (ता. १५) सकाळी अंबड-सिडको लिंकरोडवरील महेश भवन येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्‍यात तीन हजारांपेक्षा जास्‍त रोजगाराच्या संधी उपलब्‍ध असतील. ()

मेळाव्यात दहावी, बारावी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा, पदविका, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, एमबीए, एमएसडब्ल्यू, आयटी/कॉम्प्युटर इंजिनिअर आदी विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत.

तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे स्टॉल लावले जाणार असून, कर्ज योजनांची माहिती, मार्गदर्शन उपलब्‍ध असेल.

मेळाव्यात नाशिकच्‍या बॉश लिमिटेड, महिंद्र ॲन्ड महिंद्र (नाशिक व इगतपुरी), युवाशक्ती फाउंडेशन, डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, पूर्वा केमटेक (पिंपळगाव बसवंत), हेक्सागॉन न्यूट्रिशन, डेल्टा फिनोकेम (वाडीवऱ्हे), डीजी डाटा सोल्यूशन्स, क्वेस कॉर्प लिमिटेड, मिराक्वई व्हेन्च्युअर्स, एम. डी. इंडस्ट्रीज, मेड प्लस फार्मसी, हरिओम उद्योग इंडिया, रेन्बो डेकोप्लास्ट अशा एकूण ३५ पेक्षा जास्त कंपन्या व नियोक्ते तीन हजारांपेक्षा जास्‍त जागांसाठी निवड करतील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केलेली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी मेळाव्‍यास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाच्‍या सहाय्यक आयुक्‍त अनिसा तडवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT