NMC Latest marathi news
NMC Latest marathi news esakal
नाशिक

टीप मिळताच अतिक्रमणे गायब; पथकाच्या माघारी नंतर परिस्थिती जैसे थे

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये सक्षम अधिकारी नसल्याने विभागीय स्तरावर शैथिल्य आले आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात महापालिकेसह सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यातही सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांचे अतिक्रमण होत असल्याची बाब महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गांभीर्याने घेतली आहे.

तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून, कारवाईत कसूर झाल्यास अतिक्रमण अधिकाऱ्यांबरोबरच विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. (Encroachment on large scale in city nmc ignore nashik latest news)

काही महिन्यांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण विभागाला सक्षम अधिकारी नसल्याने त्याचा परिणाम अतिक्रमण वाढण्यावर होताना दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

अतिक्रमण हटाव पथक येण्यापूर्वी अतिक्रमण दूर होते, मात्र अतिक्रमण गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. अतिक्रमण विभागातूनच अतिक्रमण धारकांना टीप मिळते. त्यामुळे पथक माघारी फिरल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जागेवर दिसते. अतिक्रमण वाढण्यास महापालिकेचा हा विभागात अधिक कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे.

अतिक्रमणासंदर्भात महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. आतापर्यंत नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना या संदर्भात माहिती नव्हती. शहरातला आवाका लक्षात येत असताना आता त्यांच्याकडून कारवाईला सुरवात झाली आहे.

महापालिकेच्या जागांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर तात्पुरते अतिक्रमण होत असल्याची बाब शहरात फिरताना निदर्शनास येत असल्याने अतिक्रमण उपायुक्त व सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी कोठेही अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करताना तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. अतिक्रमण झाल्यास संबंधित विभाग व विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या इशारा त्यांनी दिला आहे.

सायकल ट्रॅक वरही अतिक्रमण

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला आहे. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार असल्याने त्यातून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच नागरिकांना पायी चालणे मुश्कील होईल अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. शहरात फिरताना सायकल ट्रॅक व फुटपाथचा वापर अनधिकृत पार्किंग साठी होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बेघरांना निवारा घर

शहरात मोठ्या प्रमाणात बेघर आढळून येत आहे. विशेष करून सिग्नलवर बेघर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने रस्त्याच्या बाजूला व फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या निराधार तसेच बेघर कुटुंबांना महापालिकेच्या निवारागृहात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

"शहरात फिरताना महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहेत. बेघर कुटुंबांना त्वरित निवारागृहात हलविण्याच्या सूचना दिल्या."

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: पुन्हा सुरू होणार फोडाफोडीचा खेळ? सुषमा अंधारेंची राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला साद

Rajya Sabha Election: राज्यसभेत बिघडणार इंडिया आघाडीचा खेळ! पोटनिवडणुकीत एनडीएचा विजय पक्का, जाणून घ्या समीरण

Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची कंपनी Oracle चे शेअर्स चांगलेच वाढले, न्यूयॉर्क पाठोपाठ BSE मध्येही दमदार कामगिरी

NTA NEET UG 2024 Re Exam: ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा; NTAनं जाहीर केली तारीख

GST: निवडणुकीत धक्का बसल्यानंतर मोदी सरकार कराचा बोजा कमी करणार? GST दरात होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT