Arjun Chavan who work to survive esakal
नाशिक

Positive News: तरुणाईला लाजवणारा ‘त्यांचा’ उत्साह! आयुष्याच्या उत्तरार्धातही जगताहेत स्वाभिमानाचं जिणं

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : उतारवयात निवांत क्षण घालवण्याच्या प्रतीक्षेत असतो. मात्र, सतत परिस्थितीच्या घाव झेलणाऱ्या अशा निवांत क्षणांची स्वप्न पाहण्याची उसंतच मिळत नाही. ते संकटांशी दोन हात करण्यात व्यग्र असतात. त्यातूनच ते आपल्या सुखाचा मार्ग शोधतात. चांदोरीतील ८५ ओलांडलेले अर्जुन चव्हाण यांचे उदाहरण आहेत.

घरची बेताची परिस्थिती पाहून उतारवयातही प्रपंचाला हातभार लागावा म्हणून ते तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात दिवसभर कष्ट करतात. (enthusiasm that shames youth of arjun chavan selfrespect even in second half of life Positive News nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

हवेचे फुगे दिवसभर पायी फिरत खेरवाडी, चितेगाव, नागापूर सह पंचक्रोशीतील गावांत विकून आपल्या दोनवेळेच्या भाकरीची आणि औषधांची सोय करतात. आयुष्यभर कोणाला ओझे झालो नाही आणि आता मरणाच्या दारात असताना का कोणाला त्रास द्यायचा. मरण येईपर्यंत हिंमतीने जगायचे, असा सुखी जीवनाचा सल्ला त्यांनी दिला.

चव्हाण यांना दोन मुलं त्यांच्या सासुरवाडीला राहतात. मुलींचे दोन मुलं आमच्याकडे राहतात. घरात पत्नी अन् दोन नातवंडे आहेत. महापुरात घरातील कागदपत्रे आणि रेशनकार्ड वाहून गेले. त्यानंतर रेशनकार्ड मिळाले नाही.

आजची तरुणाई परिस्थितीसमोर लगेचच हतबल होते. मात्र, समाजातील अशी वयोवृद्ध मंडळी उतारवयातही तरुणाईला लाजवेल, अशा उत्साहात पडेल ती कामे करून स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगण्याची दिशा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, दोनवेळा भूषवलेलं मुख्यमंत्रीपद

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात भाजपमध्ये होणार मोठं इन्कमिंग, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

SCROLL FOR NEXT