Chief Engineer Deepak Kumthekar on the platform present at Nima-Mahavitaran joint meeting, esakal
नाशिक

Nashik News: महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसमोर उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा

तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे कुमठेकर यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील आणि विशेषतः सिन्नर, दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यांतील उद्योजकांनी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासमोर विद्युत खात्याच्या समस्यांचा पाढाच वाचला.

आठ दिवसांच्या आत या समस्यांचे निराकरण न झाल्यास उद्योग बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर हे प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन कुमठेकर यांनी दिल्याने उद्योजकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Entrepreneurs read about problems before Chief Engineer of Mahavitaran Nashik News)

उद्योग जगतासाठी विजेचा पुरवठा अखंडपणे सुरू राहणे गरजेचे असते. परंतु अनेकदा पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो.

शटडाउनचे प्रकारही घडत असल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी महावितरण खात्याच्या गलथान कारभाराबद्दल जोरदार टीकास्त्र सोडून या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, अशी मागणी त्यांनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याकडे केली असता, त्यांनी तातडीने महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम बुधवारी निमा कार्यालयात आयोजित केला होता.

व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे, रवींद्र झोपे, दिंडोरीचे को-चेअरमन योगेश पाटील, सिन्नर विकास समितीचे चेअरमन किरण वाजे, प्रवीण वाबळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे आदी उपस्थित होते.

माळेगाव एमआयडीसीत सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली असून, तेथे काम सुरू करावे, तीन फिडरचे ब्रेकर बदलावे, जे डीपी बॉक्स गंजले आहेत ते बदलून नवीन टाकावेत, मनुष्यबळ वाढवावे मेंटेनन्ससाठी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच वीजपुरवठा विनाखंड सुरू राहावा आदी मागण्यांचा पाऊस पाडून सिन्नरच्या उद्योजकांनी मुख्य अभियंत्यांना कोंडीत पकडले.

या प्रकरणी कुमठेकर यांनी त्या परिसरातील अभियंत्यांची चांगलीच हजेरी घेतली. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगले फैलावरही घेतले.

एका उद्योजकाने तर वीस वर्षांपूर्वीची रिकव्हरी काढल्याची धक्कादायक माहिती बैठकीत सादर केली तेव्हा ही बाब तपासण्यात येईल आणि आवश्यकता वाटल्यास त्यात सुधारणा केली जाईल, असे कुमठेकर म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दिंडोरी तालुक्यातील उद्योजकांनी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नाही. सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. बोरगडला नवीन स्टेशन, सबस्टेशन सुरू होऊनही वीजपुरवठ्यात म्हणावा तसा फरक पडलेला नाही आदी तक्रारी केल्या.

एका उद्योजकाने आपले औद्योगिक युनिट असतानाही महावितरणने कमर्शियलप्रमाणे तब्बल २८ लाख रुपये बिल पाठविल्याचे निदर्शनास आणताच बैठकीतील सर्व जण अवाक झाले.

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, खतवड, तळेगाव औद्योगिक वसाहतींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, तळेगाव येथे शंभर खासगी उद्योग थाटण्यात आले असून, त्यांना नवीन कनेक्शन द्यायला विलंब का होतो, अशी विचारणा बेळे यांनी केली.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे आणि वाडीवऱ्हे येथील उद्योजकांनीही आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली.

आगरकर नावाचे अभियंता कधीच फोन उचलत नसल्याने आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असे उद्योजकांनी निदर्शनास आणताच त्यांचे सीमकार्ड बंद करून अन्य अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी द्या, असे निर्देश कुमठेकर यांनी दिले.

बैठकीस राजेंद्र वडनेरे, मिलिंद रजपूत, दिलीप वाघ, गोविंद झा, मनीष रावल, श्रीकांत पाटील, संदीप भदाने, सुधीर बडगुजर, संजय महाजन, कैलास पाटील, बबन चौरे, सचिन कंकरेज, किरण करवा, विश्वजित निकम, रावसाहेब रकिबे, सुनील जाधव, देवेंद्र विभूते, नितीन धात्रक यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक आणि महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT