Sahyadri Farms & TATA Strive esakal
नाशिक

Entrepreneurship Training: संकल्प प्रकल्पांतर्गत उद्योजकता प्रशिक्षण; 102 ग्रामीण युवकांना मिळाला लाभ

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Entrepreneurship Training : केंद्र शासनाच्या संकल्प प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म्स-टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्रात १०२ नवउद्योजकांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले.

नाशिक जिल्हा कौशल्य विकास कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. (Entrepreneurship training under Sankalp Project 102 rural youth have benefited nashik)

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील १०२ नवउद्योजकांच्या चार बॅचेसमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण भागातील उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणपूर्व निवड चाचणी घेऊन त्यामध्ये ज्यांची निवड झाली त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या निवडप्रक्रियेत महाराष्ट्रातील एकूण ७०० विद्यार्थ्यांनी निवड चाचणीत सहभाग घेतला. त्यापैकी १०२ मुलांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. दहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभर त्यांना उद्योग उभारणीसाठी सहाय्य केले जाणार आहे.

वय वर्षे १८ ते ३५ वयोगटांतील २२ तरुणी व ८० तरुणांनी प्रशिक्षण घेऊन कृषी आणि इतर क्षेत्रात व्यवसाय उभारणी करीत आहेत. यामध्ये ४० कृषी क्षेत्रातील, तर ६२ अकृषिक क्षेत्रात उद्योग करणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मार्गदर्शन व वित्त सहाय्यही

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या उद्योगांशी संबंधित विषयावर दर महिन्याला मार्गदर्शक सत्रे आयोजित केली जातात. यामध्ये भांडवल उभारणी, बाजार जोडणे, मार्केटिंग, उत्पादन, मनुष्यबळ व्यवस्थापन, विक्री, नेतृत्वगुण, व्यवसाय व्यवस्थापन आदी विषयांवर त्या क्षेत्रातील जाणकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र ६१ विद्यार्थ्यांना सीडबी आणि टाटा कॅपिटल यांच्या माध्यमातून १४.६० लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. यातील पहिल्या टप्प्यात २३ प्रशिक्षणार्थींना ४.६० लाख, दुसऱ्या टप्प्यात २६ प्रशिक्षणार्थींना ४.८० लाख, तर तिसऱ्या टप्प्यात १२ प्रक्षिणर्थींना ४.८० लाख अशा पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

सह्याद्री फार्म्स-टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्रात आतापर्यंत १६३ विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीसाठी त्यांना ३८.१० लाख आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. भविष्यात ग्रामीण भागात उद्योजकांना अशाच पद्धतीचे प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

"उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात मी दहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आज स्वतःचा केक आणि बेकरीचा व्यवसाय ओझर येथे करीत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला भांडवलाची मदत मिळाल्यामुळे मी आज व्यवसाय वाढवू शकले व त्यातून कुटुंबाचा आर्थिक भार उचलला आहे, याचा मला आनंद वाटतो." -तरन्नुम शेख, ओझर-नाशिक, प्रशिक्षणार्थी

"मला स्वत:चा व्यवसाय करावा असे वाटायचे; परंतु तो कसा करायचा त्याविषयीची जास्त माहिती नसल्यामुळे माझा आत्मविश्‍वास कमी झालेला होता. त्याच दरम्यान मला या प्रशिक्षणाविषयी माहिती मिळाली व त्यात माझी निवड झाली. प्रशिक्षणातून व्यवसायासंबंधी बारकावे समजून घेऊन त्याचा व्यवसाय चालविण्यासाठी नक्कीच फायदा होईल."

-संदीप गायकवाड, पुणे, प्रशिक्षणार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT