छत्रपतीं sakal
नाशिक

नाशिक : पंचवटी कारंजावर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

गुजरातच्या दिशेने नाशिक शहरात आल्यानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक नजरेस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुजरातच्या दिशेने नाशिक शहरात आल्यानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक नजरेस पडावे, या हेतूने पंचवटी कारंजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने विविध संस्थांकडून देकार मागविले असून, अंदाजित एक कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. ब्रॉन्झ धातूचा पुतळा कारंजावर बसविला जाणार आहे.

पंचवटी कारंजा येथून गुजरात, राजस्थानकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावरून हजारो गुजरातमधील लोक रामकुंडावर स्नानासाठी तसेच उद्योग, व्यवसायानिमित्त येतात. गुजरातकडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक नजरेस पडावे, या हेतूने पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे नियोजन अनेक वर्षांपासून आहे. पंचवटीतील नागरिकांनीदेखील अनेकदा निवेदने देवून पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी केली होती. यापूर्वी कांरजावर अर्धाकृती पुतळा होता. त्यानंतर पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला, मात्र पुतळ्याची उंची कमी आहे. सन २०१८ पासून अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी होती. आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासह माजी उपमहापौर गुरमित बग्गा, काँग्रेसचे पदाधिकारी नरेश पाटील, मनसेचे खंडू बोडके आदींनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला.

काही दिवसांपूर्वी पंचवटीतील स्थानिक कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली होती. त्यानुसार ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली. एक कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे. साधारण सहा महिन्यात पुतळा बसविण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची पूर्णाकृती पुतळ्याची मागणी होती. त्यानुसार सर्वपक्षीयांच्या पुढाकारातून आम्ही पुतळ्यासाठी प्रयत्न केले.

- ॲड. राहुल ढिकले, आमदार.

गुजरातच्या दिशेने आल्यानंतर पंचवटी कारंजा हे प्रमुख प्रवेशद्वार लागते. तेथे छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

- गुरमित बग्गा, स्थानिक नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT