malegaon to cidco supected.png 
नाशिक

संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) पवननगर, लोकमान्यनगर येथे मालेगाव येथून होम क्वारंटाइन असलेले तीन कोरोना संशयित पळून आले. त्यांना येथील नागरिकांनी आसरा दिल्याने प्रशासनाकडून याबाबत करवाई करण्यात आली आहे. संचारबंदी असतांना देखील हे तीन संशयित मालेगाववरुन सिडकोत आलेच कसे? हा प्रश्न उभा राहिला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मालेगाव येथून तीन कोरोना संशयित होम क्वारंटाइन रुग्ण पवननगर, लोकमान्यनगर येथील काळे चाळ येथे पळून आले. गेल्या सहा ते सात दिवसांपासून ते येथील एका नातेवाईकाकडे आसऱ्याला होते. या संशयितांना घर न सोडण्याचे आदेश असतानाही यांनी नाशिक गाठले. जिल्हा शासकीय रुग्णालयातूनही त्यांनी पळ काढल्याचे समजते. याबाबत येथील नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली असता, त्यांनी तत्काळ पोलिस व आरोग्य विभागाला कळविले. त्यांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतले. याच काळे चाळीत अनेक कुटुंबीय राहात असून, कोरोना संशयितांमुळे या सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संशयितांच्या नातेवाईकांनी नगरसेवक शहाणे यांना कारवाई करीत असल्याने शिवीगाळ केली. 

मालेगाववरून नाशिकला आलेच कसे?

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव, तालुका, जिल्हा व संचारबंदी असताना हे संशयित मालेगाववरून नाशिकला आलेच कसे? याबाबत आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय सिडकोतील काळे चाळीत भाडेकरू राहात असून, घरमालकाच्या बेजबाबदारपणामुळे त्यांना आसरा मिळाला. या संशयितांना आता किती लोकांसोबत संपर्क आला याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रकारावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT