Mother-in-law buying brass utensils for son-in-law and daughter-in-law esakal
नाशिक

Adhik Maas 2023: बदलत्या काळातही ‘अधिक’ मासातील वाणासाठी तांब्याच्या भांड्यांनाच पसंती!

दत्ता जाधव

Adhik Maas : मंगळवारपासून (ता.१८) सुरू होणाऱ्या अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम किंवा मलमास असेही म्हटले जाते. या महिन्यात केलेले धार्मिक कार्य व दानधर्मामुळे मोक्षप्राप्तीसह अधिक फलप्राप्ती होते.

हिंदू धर्मशास्त्रात मुलगी व जावयास लक्ष्मीनारायण स्वरूप मानले जाते. त्यामुळे जावयासह ब्राह्मण, देव, गुरू यांना दान देण्याला महत्त्व आहे. बदलत्या काळातही लेक जावयाला वाण देण्यासाठी अद्यापही तांब्याच्या भांड्यांनाच पसंती दिली जात आहे. (Even in changing times copper pots preferred for adhik maas varieties nashik)

अलीकडच्या काळात जावयाला देण्यात येणाऱ्या भेटवस्तूच्या स्वरूपात काहीसा बदल झालेला असलातरी अद्यापही तांब्याची भांडी व कपडे भेट देण्यास ‘अधिक’ पसंती दिली जात आहे.

बाजारात वाण देण्यासाठी तांब्याचे घंगाळे, आकर्षक दिवे, निरांजन, तबक, घागर, नक्षीदार ताह्मण विक्रीसाठी आले आहेत.

त्यात तांब्याचे ताम्हण दोनशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. गडवा (तांब्या) दोनशे रुपयांपासून साडेपाचशे रुपये, घागर- साडेपाचशे ते बाराशे रुपये, तबक दोनशे ते साडेसहाशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

दीपदानाला महत्त्व

अधिक मासात अन्य दानाबरोबरच दीपदानाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे भांडी बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक दिवे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अवघ्या पन्नास रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत वेगवेगळ्या आकारातील आकर्षक दिवे उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कास्याच्या थाळीचे आकर्षण

अधिक मासाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात खास कास्य धातूचा थाळी सेट विक्रीस आला असून, तो सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यात आकर्षक थाळीसह दोन वाट्या, ग्लास, डिश, चमचा उपलब्ध आहेत.

नव्यानेच दाखल झालेल्या कास्य धातूच्या या सेटला मोठी मागणी असल्याचे बालाजी मेटल्सचे ओंकार क्षीरसागर यांनी सांगितले. अधिक मासात इतर दानाबरोबरच कपडे दानासही मोठे महत्त्व आहे.

त्यामुळे जावयास कपडे तर मुलीला नवी साडी घेतली जाते. अलीकडे रेडिमेडचा काळ असल्याने तयार शर्ट पॅन्टसह अन्य खरेदीला पसंती दिली. त्यामुळे तयार कपड्यांच्या (रेडिमेड) बाजारातही खरेदीदारांच्या प्रतिसादाने मोठा उत्साह आहे.

"तांब्याच्या दरात वाढ झाल्याने यंदा तांब्याच्या भांड्यांच्या दरांत दहा टक्क्यांच्या आसपास वाढ झाली आहे, परंतु तरीही खरेदीदारांत उत्साह आहे."

- ओंकार क्षीरसागर, संचालक, बालाजी मेटल्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

SCROLL FOR NEXT